Weekly Money Horoscope : श्रावण महिना सुरु होताच 'या' राशींच्या नशिबात पैसाच पैसा

Weekly Money Horoscope 17 t0 23 July 2023 : सोमवारपासून नवीन आठवड्याला सुरुवात होणार आहे. सोमवती अमावस्या, सूर्य गोचर अधिकमास आणि श्रावण महिन्याला सुरुवात असा हा आठवडा आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Jul 16, 2023, 01:43 PM IST
 Weekly Money Horoscope : श्रावण महिना सुरु होताच 'या' राशींच्या नशिबात पैसाच पैसा title=
weekly money horoscope 17 t0 23 July 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy at shravan month 2023

Money Horoscope Weekly 17 t0 23 July 2023 : हा आठवडा अतिशय खास असणार आहे. सूर्य गोचरमुळे बुध सूर्याची भेटीमुळे चार राजयोग तयार होतं आहे. त्याशिवाय याच आठवड्यात शुक्री वक्री स्थितीत जाणार आहे. आठवड्याची सुरुवातीला सोमवती अमावस्या असून अधिक मास आणि श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. अशा या आठवड्यात काही राशींच्या आयुष्य पैसाच पैसा असणार आहे. 

मेष (Aries)

या राशीसाठी हा आठवडा आर्थिकृष्ट्या भाग्यशाली असणार आहे. प्रगतीसोबत आर्थिक फायदा होणार आहे. प्रवासाचे योग असून यातून तुम्हाला प्रगतीचे अनेक मार्ग सापडतील. मात्र कुटुंबातील काही गोष्टींमुळे तुमचं मन उदास राहिल. आठवड्याचा शेवटी वृद्ध व्यक्तीसाठी तुमचं मनं चिंतेत असणार आहे. 
 

शुभ दिवस: 18,20

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा धनवृद्धी करणारा ठरणार आहे. भागीदारीत तुम्ही केलेली गुंतवणूक आर्थिक फायदा करणार आहे. मालमत्तेतूनही तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. तुमच्या मनासारख्या गोष्टी होतं असल्याने तुम्ही आनंदी असणार आहात. जोडीदारासोबत क्वालिटी टाइम घालविणार आहात. मात्र कार्यक्षेत्राच्या ठिकाणी बाहेरील व्यक्तीला हस्तक्षेप करु देऊ नका. कुटुंबाला दिलेलं आश्वासन तुम्ही या आठवड्यात पूर्ण करणार आहात. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी लकी ठरणार आहे. 

शुभ दिवस: 17, 18, 21

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवड्या लाभदायक ठरणार आहे. एखाद्या शुभकार्यात तुम्ही सहभागी होणार आहात. प्रवासातून होणारा फायदा पाहून तुमचं मनं प्रसन्न राहणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा जरा खर्चिक असणार आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी नवीन कामामुळे मनं जरा संभ्रमात असेल. आठवड्याच्या शेवटी प्रिय व्यक्तीच्या भेटीने मनं आनंदी असेल. 

शुभ दिवस: 18, 19, 20

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायद्याचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळणार आहे. नवीन प्रकल्पातून शुभ वार्ता समजेल. आर्थिक घडी तुमची या आठवड्यात व्यवस्थित बसेल. लव्ह लाइफमध्ये आनंदाचे क्षण व्यतित करणार आहात. प्रवासाचे योगदेखील या आठवड्यात आहेत. अनोळखी व्यक्ती भविष्यात तुमच्या कामी येणार आहे. आठवड्याच्या शेवटी एखादे प्रकरण चर्चेने सोडल्यास तुम्हाला फायदा होईल. 

शुभ दिवस: 19, 20

सिंह (Leo)

 

या राशींसाठी हा आठवडा प्रगतीची आहे. यशासोबत आर्थिक फायदा हा आठवडा या राशींच्या लोकांसाठी घेऊन आला आहे. भागीदारीत केलेली गुंतवणूक तुम्हाला आर्थिक फायदा घेऊन येईल. आरोग्याच्या बाततीत मात्र सतर्क राहा. जुनं दुखणं तुम्हाला त्रासदायक ठरु शकतं. कुटुंबाच्यासोबतचा वेळ तुम्हाला आनंद देऊन जाईल. आठवड्याच्या शेवटी प्रवासाचे योग आहेत. 

शुभ दिवस: 18, 19, 20

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक गणित मजबूत करणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी सगळं व्यवस्थितीत असूनही तुमचं मनं अस्वस्थ राहिल. भागीदारीत कुठलं काम करणार असाल तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. प्रगतीसोबत धनयोगाचे मार्ग मोकळे होणार आहात. कुटुंबातील एखाद्या महिलेच्या तब्येतीमुळे तुम्ही चिंतेत असाल. आठवड्याच्या शेवटी तुम्ही भावनिक अस्वस्थ असू शकता. 

शुभ दिवस: 18,20

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा धनलाभ घेऊन आला आहे. विचापूर्वक आणि शहाणपणाने घेतलेले निर्णय तुमच्या फायदाचे ठरणार आहेत. कार्यक्षेत्रातील तुमची नेटवर्किंग तुमच्या यशाची पायरी ठरणार आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असणार आहे. यशाचं दुसरं गमक म्हणजे कठोर मेहनत त्यामुळे त्याचीही जोड तुमच्या कामात ठेवा. या आठवडा थोडा खर्चिक असणार आहे. बाहेरगावी जाण्याचे बेत असल्यास पुढे ढकला. आठवड्याच्या शेवटी मनं जरा उदास राहिल. 

शुभ दिवस: 18

वृश्चिक (Scorpio)

या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि तुम्ही तुमच्या प्रकल्पाच्या यशाबद्दल आनंदी व्हाल. तथापि, या आठवड्यात खर्च जास्त असू शकतो आणि कोणत्याही नवीन गुंतवणुकीबद्दल मन दुःखी राहू शकते. या आठवड्यात तुम्ही तुमच्या तब्येतीकडेही लक्ष द्यावे, जास्त तणावामुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. पैशाच्या बाबतीत हुशारीने खर्च करा, अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

शुभ दिवस: 19

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगती घेऊन आला आहे. या लोकांची आर्थिक स्थितीही मजबूत होणार आहे.  कामाच्या ठिकाणाहून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. मात्र आर्थिक व्यवहार करताना जोखीम पत्करल्याशिवाय प्रगतीचा मार्ग गवसणार नाही. या आठवड्यात प्रवास टाळणेच योग्य ठरणार आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालविणार आहात. 

शुभ दिवस: 18, 20

मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणार आहे.  तुमचं बँक बॅलेन्स चांगल्या स्थितीत येणार आहे. आरोग्याविषय काळजी घेणे तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे. प्रवासातून प्रगतीचे मार्ग साध्य होणार आहे. आयुष्यात सुख समृद्धीचे सुवर्ण योग या आठवड्यात जुळून आले आहेत. आठवड्याच्या शेवटी घरातील ज्येष्ठ व्यक्तीमुळे तुम्हाला मदतीचा हात मिळेल. 

शुभ दिवस: 19, 21

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरणार आहे. कामातील यशामुळे तुमचं मनं प्रसन्न राहणार आहे. आर्थिक गणितही या आठवड्यात सुटणार आहे. कुटुंबातील सदस्याकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. हा आठवडा खर्चिक ठरणार आहे. आर्थिक व्यवहार करताना लक्ष द्या. या आठवड्यात प्रवास टाळा. आठवड्याचा शेवट संमिश्र असेल. 

शुभ दिवस: 18, 19

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक फायदा घेऊन आला आहे. पण तरीदेखील गुंतवणुकीवरुन तुमचं मनं चितेत असेल. प्रवासातून प्रगती आणि यश तुम्हाला प्राप्त होणार आहे. जीवनातील नवीन बदल तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणेल. कुटुंबाला दिलेले वचन तुम्ही या आठवड्यात पूर्ण करणार आहात. 

शुभ दिवस: 20, 21

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)