Suryakumar Yadav: खरा Mr.360 कोण? एबीडी की सुर्या? खुद्द डिव्हिलियर्सने दिलं उत्तर!

New Mr.360 Suryakumar Yadav: सुर्यकुमार यादव म्हणजे भारताचा एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) असल्याचं साऊथ अफ्रिकेचा स्टार गोलंदाज डेल स्टेनने (Dale Steyn) म्हटलं. त्यानंतर आता...

Updated: Nov 7, 2022, 08:37 PM IST
Suryakumar Yadav: खरा Mr.360 कोण? एबीडी की सुर्या? खुद्द डिव्हिलियर्सने दिलं उत्तर! title=
AB de Villiers on Suryakumar Yadav

AB de Villiers on Suryakumar Yadav:​ सध्या सुरू असलेल्या T20 World Cup मध्ये टीम इंडियाने सेमीफायनलचं तिकीट मिळवलं. टीम इंडियाचा आगामी सामना इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG T20) खेळला जाणार आहे. भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवण्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या दोन फलंदाजांचं महत्त्वाचं योगदान होतं. अशातच आता सुर्याच्या विराट खेळीमुळं त्याचं जगभरात कौतूक होताना दिसत आहे.

सुर्यकुमार यादव म्हणजे भारताचा एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) असल्याचं साऊथ अफ्रिकेचा स्टार गोलंदाज डेल स्टेनने (Dale Steyn) म्हटलं आहे. सुर्यकुमारसाठी मी T20 World Cup बघणार असल्याचं देखील त्याने यावेळी म्हटलं होतं. सुर्याचे चौफेर फटकेबाजी पहायला आवडते, असंही तो म्हणाला होता. त्यानंतर सुर्याची तुलना Mr.360 एबी डिव्हिलियर्स याच्यासोबत होताना दिसत आहे.

सुर्याला याबाबत विचारलं असता, जगात एकच Mr.360 आहे, तो म्हणजे एबी डिव्हिलियर्स, असं सुर्या म्हणाला होता. त्यावर आता एबी डिव्हिलियर्सने उत्तर दिलं आहे. तू फारच वेगाने त्या दिशेने वाटचाल करतोयस मित्रा... खरं तर त्याहूनही अधिक कौशल्यपूर्ण  तू आहेस. आज फार छान खेळलास, असं डिव्हिलियर्स म्हणाला.

पाहा कमेंट- 

दरम्यान, खुद्द डिव्हिलियर्सने (New Mr.360 Suryakumar Yadav) कौतूक केल्याने सुर्या देखील भारावून गेलाय. भारताच्या आतापर्यंतच्या विजयात गोलंदाजांपेक्षा विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या दोन खेळाडूंचा खूप मोठा वाटा आहे. सूर्यकुमारनेही 3 अर्धशतकांच्या जोरावर आत्तापर्यंत 225 धावा केल्या आहेत.