Aman Sehrawatने अवघ्या 10 तासांत घटवलं 4.5 किलो वजन, काय होता Diet फंडा

Aman Sehrawat Diet : अमन सेहरावतची सगळी मेहनत फळाला आली आणि अमनने कांस्यपदक पटकावलं. शुक्रवारी पोर्तो रिकोच्या डॅरियन क्रुझचा पराभव करून अमन भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पदक विजेता बनला. पण या अमनने 4.5 किलो वजन कसं कमी केलं हे देखील कौतुकास्पद आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 10, 2024, 01:22 PM IST
Aman Sehrawatने अवघ्या 10 तासांत घटवलं 4.5 किलो वजन, काय होता Diet फंडा title=

गुरुवारी उपांत्य फेरीतील पराभवानंतर अमन सेहरावतचे वजन 61.5 किलोग्रॅम पर्यंत पोहोचले होते. पुरुषांच्या 57 किलोग्रॅममधील मर्यादेपेक्षा अगदी 4.5 किलोग्रॅम वजन जास्त आहे.  पण पुढच्या 10 तासांत त्याने आपल्या भारतीय प्रशिक्षकांसह अथक परिश्रम करून 4.6 किलो वजन कमी केले. 

जगमंदर सिंग आणि वीरेंद्र दहिया हे दोन वरिष्ठ भारतीय प्रशिक्षक हे कुस्तीच्या 6 मेंबर्सशी संलग्न आहे. यांनी एक   'मिशन' म्हणून ही गोष्ट स्वीकारली. विनेश फोगटसोबत घडलेल्या घटनेनंतर त्यांना आणखी एक धक्का बसू नये म्हणून सर्व ती काळजी घेण्यात आली. विनेश फोगट महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत दुसऱ्या दिवसाच्या वजनात 100 ग्रॅमने जास्त वजन असल्याबद्दल तिच्या अपात्रतेविरुद्ध कायदेशीर लढाई लढत आहे. त्यामुळे 21 वर्षीय अमनने वजनाच्या बाबतीत विशेष काळजी घेतली. 

21 वर्षीय अमनने अजिबात वेळ वाया न घालवता 4.5 किलो वजन रातोरात कमी करण्याचा निर्णय घेतला. 

असे होते 'ते' 10 तास 

  • 'मिशन'ची सुरुवात दीड तासाच्या मॅट सत्राने झाली. 
  • त्यानंतर दोन वरिष्ठ प्रशिक्षकांनी त्याला कुस्तीमध्ये गुंतवून ठेवले. त्यानंतर एक तासाचे हॉट-बाथ सत्र झाले.
  • 12:30 वाजता  अमन जीममध्ये गेला. जिथे अमन ट्रेडमिलवर एक तास न थांबता धावला. 
  • भरपूर घाम आल्याने वजन कमी करण्यास मदत झाली. 
  • त्यानंतर अमनला 30 मिनिटांचा ब्रेक देण्यात आला, त्यानंतर 5 मिनिटांच्या सॉना बाथची पाच सत्रे झाली.
  • शेवटच्या सत्राच्या शेवटी, अमनचे वजन 900 ग्रॅम जास्त होते. त्याला मसाज देण्यात आला आणि त्यानंतर हलके जॉगिंग करण्यास सांगितले.
  • त्यानंतर 15 मिनिटांची पाच सत्रे झाली. पहाटे 4:30 पर्यंत, अमनचे वजन 56.9 किलो - 100 ग्रॅम कमी होते. प्रशिक्षक आणि कुस्तीपटूंनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
  • यानंतर अमनला कोमट पाण्यात लिंबू आणि मध आणि थोडी कॉफी प्यायला देण्यात आली.
  • त्यानंतर अमन झोपला नाही. "मी रात्रभर कुस्तीचे व्हिडिओ पाहिले.", असं अमनने सांगितले. 
  • “आम्ही दर तासाला त्याचे वजन तपासत राहिलो. आम्ही रात्रभर झोपलो नाही, दिवसाही झोपलो नाही,” प्रशिक्षक दहिया म्हणाले.

सर्वात तरुण खेळाडू

अमन सेहरावत हा भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पदक विजेता ठरला आहे. त्याने वयाच्या 21 वर्षे 24 दिवसांत ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले. अमनच्या आधी, पीव्ही सिंधूने 21 वर्षे, एक महिना आणि 14 दिवस वयाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पहिले पदक जिंकले होते. यापूर्वी विनेश फोगटने अंतिम फेरी गाठली होती, मात्र अपात्र घोषित केल्यामुळे तिला आतापर्यंत पदक मिळालेले नाही.