कोहली-धोनीच्या पत्नींमध्ये लहानपणापासूनच कनेक्शन? पाहा त्यांचे Unseen Photo

साक्षी - अनुष्कामध्ये ही खास गोष्ट 

Updated: Dec 17, 2021, 12:20 PM IST
कोहली-धोनीच्या पत्नींमध्ये लहानपणापासूनच कनेक्शन? पाहा त्यांचे Unseen Photo  title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील दोन दिग्गज खेळाडू महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली हे चांगले मित्र तर आहेतच. पण यांच्या पत्नींमध्ये देखील एक खास कनेक्शन आहे. अनुष्का विराटची पत्नी होण्यापूर्वी साक्षीची मैत्रिण आहे. साक्षी आणि अनुष्का या दोघीजणी शाळेपासूनच्या मैत्रिणी आहेत. या दोघींचं शिक्षण एकत्र झालं असून आजही यांची मैत्री कायम आहे. 

अनुष्काचं वडिल इंडियन आर्मीत ऑफिसर होते. त्यांच पोस्टिंग आसाममध्ये झाली होती. तेव्हा अनुष्का सेंट मेरी शाळेत शिकत होती. त्याच शाळेत त्यावेळी साक्षी देखील शिकत होती. 

एकाच शाळेत शिकल्या अनुष्का आणि साक्षी 

सोशल मीडियावर अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनीचे असे अनेक फोटो आहेत, ज्यामध्ये दोघे एकत्र दिसत आहेत. अनुष्का शर्माने 2013 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की, 'साक्षी आणि मी आसाममधील एका छोट्या शहरात एकत्र राहत होतो. जेव्हा तिने मला ती कुठे राहते हे सांगितले तेव्हा मी म्हणालो व्वा, मी पण इथेच राहतो. ती म्हणाली की मी या शाळेत शिकत असे, मी सुद्धा या शाळेत जायचे असे सांगितले.

लहानपणीचा फोटो व्हायरल 

साक्षी धोनी आणि अनुष्का शर्मा यांच्या शाळेचे ग्रुप फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनुष्का आणि साक्षी यांच्या लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लहानपणीच्या फोटोत अनुष्का गुलाबी रंगाच्या लहंग्यात दिसत आहे. तर साक्षीने परीचा ड्रेस परिधान केलाय.  

आपल्या स्वतःच्या आयुष्यात आनंदी आहेत अनुष्का - साक्षी 

याशिवाय दोघांचे एकत्र मोठे होतानाचे फोटो आहेत. ज्यामध्ये दोघेही त्यांच्या मित्रांसोबत दिसत आहेत. या फोटोमध्ये साक्षी आणि अनुष्का त्यांच्या मित्रांसोबत पोज देताना दिसत आहेत. आज दोघीही आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत आणि दोघींनाही एक मुलगी आहे. या वर्षी जानेवारीत अनुष्का आई झाली असून तिच्या मुलीचे नाव वामिका आहे. त्याचबरोबर साक्षीच्या मुलीचे नाव जीवा धोनी आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x