Arjun Tendulkar : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ( ICC World Test Championship ) ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या सामन्यानंतर टीम इंडियाच्या ( Team India ) खेळाडूंना तब्बल 1 महिना कोणतीही सिरीज किंवा दौरा नाहीये. त्यामुळे टीम इंडिया ( Team India ) तब्बल 1 महिना आता क्रिकेटपासून दूर असणार आहे. यानंतर आता 12 जुलै रोजी टीमचा सामना वेस्ट इंडिजसोबत होणार आहे. वेस्ट इंडिजसोबत टेस्ट सामना रंगणार असून याठिकाणी 5 सामन्यांची टी-20I सिरीज खेळायची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेस्ट इंडिजविरूद्धच्या टी-20 सिरीजमध्ये नवख्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. अशामध्ये अर्जुन तेंडुलकरचं ( Arjun Tendulkar ) नाव अग्रस्थानी असल्याचं समोर आलंय. त्यामुळे वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar ) संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma ) ला आराम देण्यात येण्याची शक्यता आहे. अशावेळी हार्दिक पंड्या टीमची कमान सांभाळणार असल्याची चर्चा आहे. शिवाय यावेळी टीममध्ये अर्जुन तेंडुलकरचा( Arjun Tendulkar ) समावेश केला जाऊ शकतो.
यंदाची आयपीएल 2023 मध्ये अर्जुनला तब्बल 3 वर्षांनंतर मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली. आयपीएलमध्ये अर्जुनला ( Arjun Tendulkar ) केवळ 4 सामने खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर आता वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात अर्जुनच्या नावाचा समावेश होणार असल्याची चर्चा आहे. या सिरीजसाठी 15 सदस्यांची निवड केली जाणार असून त्यामध्ये अर्जुनच्या ( Arjun Tendulkar ) नावाचा समावेश असू शकतो.
नुकत्याच हाती आलेल्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या ( BCCI ) क्रिकेट कंट्रोल बोर्डने सिलेक्शन समितीचे अंतरिम चेअरमन शिव सुंदर दास यांनी 20 तरूण ऑलराऊंडर खेळाडूंना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये येण्यासाठी निमंत्रण पाठवलंय. दरम्यान या 20 खेळाडूंमध्ये अर्जुनच्या ( Arjun Tendulkar ) नावाचाही समावेश आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये हा कॅम्प सुरु होणार आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये अर्जुनने ( Arjun Tendulkar ) कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या सामन्यात डेब्यू केला. अर्जुनला मुंबईकडून केवळ 4 सामने खेळण्याची संधी मिळाली. यावेळी 4 सामन्यांमध्ये अर्जुनला 3 विकेट्स घेण्यास यश मिळालं. याशिवाय एका सामन्यात फलंदाजी करताना अर्जुनने 9 बॉल्समध्ये 13 सामन्यांची खेळी केली होती.