LSG vs MI : अर्जुन तेंडुलकरला चावला कुत्रा, सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, पाहा VIDEO

Dog Bites Arjun Tendulkar : आयपीएल 2023 च्या हंगामात मुंबई इंडियन्सने चांगली कामगिरी केली आहे. सध्या मुंबई संघाची प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र त्यापूर्वीच मुंबई संघाची डोकेदुखी वाढवणारी एक घटना पुढे आली आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: May 16, 2023, 10:33 AM IST
LSG vs MI : अर्जुन तेंडुलकरला चावला कुत्रा, सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, पाहा VIDEO  title=
Arjun Tendulkar IPL 2023

Arjun Tendulkar IPL 2023 : आयपीएल 2023 (ipl 2023) चा 63 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यात होणार आहे. एकना स्टेडियमवर आज, संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार असून या सामन्याद्वारे दोन्ही संघांना प्लेऑफच्या दिशेने आपली ताकद वाढवायची आहे. कारण आजच्या सामन्यातील पराभूत दोन्हा संघासाठी प्लेऑफच्या शर्यतीत अडचणी निर्माण होणार आहेत. मात्र या सामन्यापूर्वीच मुंबई संघाची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे.

मुंबई संघाचा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar) हाताला कुत्र्याने चावा घेतला आहे. लखनऊमध्ये हा प्रसंग घडल्याची माहिती अर्जुनच्यावतीने मुंबई इंडियन्सकडून देण्यात आली आहे. अर्जुन लखनऊच्या एकना स्टेडियममध्ये एलएसजीच्या खेळाडूंना भेटायचा, तेव्हा त्याने हा खुलासा केला. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.  

लखनऊ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अर्जुन तेंडुलकर दोन लखनऊचे खेळाडू युद्धवीर सिंग चरक आणि मोहसिन खन्ला यांना भेटताना दिसत आहे. या भेटीत तो त्या दोघांना सांगत आहे की, त्याला कुत्रा चावला आहे. 

जखम किती गंभीर?

अर्जुन तेंडुलकरला कुत्रा कधी चावला? यावर त्याने एकदिवस आधी चावला असं उत्तर दिले. अर्जुनची विचारपूस केल्यानंतर युद्धवीर सिंग आणि मोहसिन खान यांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला. कुत्र्याने अर्जुनच्या डाव्या हातावर चावा घेतला. हे व्हिडिओवरून स्पष्ट दिसते. दुखापतीच्या खुणा त्याच्या बोटांजवळच आहेत. त्यामुळे तो नेटवर गोलंदाजी करताना दिसणार नाही. 

दरम्यान आजच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध खेळणार आहे की नाही? हे अद्याप स्पष्ट नाही. आयपीएलच्या 16 व्या हंगामात त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात पदार्पण केले. पदार्पणानंतर त्याने सलग 4 सामने खेळले आणि त्यानंतर तो लीगमधून बाहेर पडला. अर्जुन तेंडुलकरने IPL 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या 4 सामन्यात 3 विकेट घेतल्या आहेत. 

लखनऊ सुपरजायंट्सचा संघ ताज हॉटेलमध्ये थांबला असून रविवारी त्यांनी येथील अलटबिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये सराव केला. तसेच मुंबई इंडियन्सचा संघही तिथेच आहे. त्यामुळे अर्जुनला कुत्रा हॉटेलमध्ये चावला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या ट्विटरवरील या व्हिडिओवरुन युजर्स अनेक प्रश्न विचारत आहेत. कुत्र्या नेमका कुठे चावला, कोणत्या प्रजातीचा होता, असेही प्रश्न युजर्स विचारत आहेत. 

मुंबईसाठी आजचा सामना महत्त्वाचा....

लखनऊच्या एकना स्टेडियमवर होणारा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. हा सामना एलिमिनेटर नाही, मात्र या मॅचचा फिल तासच असेल. त्यामुळे पराभूत युनियनसाठी प्लेऑफच्या अडचणी वाढणार आहेत. आयपीएल 2023 मधील दोन्ही संघांमधील हा पहिला सामना असेल. आयपीएलच्या या हंगामात दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले होते. त्यावेळी लखनौ सुपर जायंट्सने दोन्ही सामने जिंकले होते. आज कोणता संघ जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.