आयपीएल २०२१ : दिग्गज भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा अनेकदा आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा नेट गोलंदाज म्हणून पाहिला जातो. तो नेट गोलंदाज म्हणून टीम इंडियाशी देखील जुडलेला आहे. पण तो आता इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या 14 व्या सीजनमध्ये खेळताना दिसू शकतो. यावेळी आयपीएलच्या लिलावात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावली जाऊ शकते.
अर्जुन तेंडुलकरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021 मध्ये पदार्पण केले. त्यामुळे तो आता आयपीएलच्या लिलावात सामील होण्यासाठी देखील पात्र ठरला आहे. या टी-20 स्पर्धेत ज्युनिअर तेंडुलकरने यावेळी मुंबई संघाकडून दोन सामने खेळले. दोन्ही सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला. ज्यामध्ये अर्जुनची कामगिरी इतकी चांगली नव्हती.
माध्यमांच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने आयपीएल २०२१ साठी खेळाडूंची नावे लिलावात पाठविण्यासाठी काही नियम बनवले आहेत आणि अर्जुन तेंडुलकर मुंबईत खेळताच पात्र ठरला. त्याच वेळी, आता अर्जुन तेंडुलकरला ऑनलाईन नोंदणी प्रणालीमध्ये लॉग इन करावे लागेल आणि आयपीएल 2021 च्या लिलावासाठी आपली आवड दर्शवावी लागेल, त्यानंतर राज्य क्रिकेट संघटना (मुंबई क्रिकेट असोसिएशन) उर्वरित औपचारिकता पूर्ण करेल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएल 2021 चा लिलाव जाहीर केला आहे. बीसीसीआयने माहिती दिली आहे की आयपीएलचा 14 वा हंगामासाठी लिलाव 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होणार आहे. यावेळी हा लिलाव मिनी असेल, परंतु २०२२ च्या आयपीएलपूर्वी मेगा लिलाव होणार आहे, कारण सर्व संघ पुन्हा तयार होतील आणि आणखी दोन नवीन संघही इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी होतील.