...म्हणून डेव्हिड वॉर्नरला पवार दाम्पत्याचं याड लागलं

बॉलिवूड चित्रपट गीतं म्हणू नका किंवा मग एखादा डायलॉग... 

Updated: Jun 9, 2020, 02:51 PM IST
...म्हणून डेव्हिड वॉर्नरला पवार दाम्पत्याचं याड लागलं  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : coronavirus कोरोना व्हायरसमुळं सुरु झालेल्या अतिशय कठीण अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकानंच लॉकडाऊनमध्ये वेळ व्यतीत करण्यासाठी आपला असा विरंगुळा शोधला होता. किंबहुना अनेक ठिकाणी अद्यापही हे लॉ़कडाऊन सुरु असल्यामुळं विरंगुळा शोधला आहे, असंच म्हणणं वावगं ठरणार नाही. 

संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या लॉकडाऊनच्या या काळात सेलिब्रिटी, खेळाडूंपासून अगदी बडे नेतेसुद्धा लॉकडाऊनच्या काळात स्वत:चा विरंगुळा शोधत आहेत. या साऱ्यामध्ये चर्चेत आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू, डेव्हिड वॉर्नर. वॉर्नरनं टिकटॉक TikTok व्हिडिओ तयार करत आणि त्यामध्ये आपल्या कुटुंबालाही समाविष्ट करुन घेत हा ट्रेंड भलताच मनावर घेतल्याचं दिसत आहे. 

बॉलिवूड चित्रपट गीतं म्हणू नका किंवा मग एखादा डायलॉग, डेव्हिड आणि त्याचं कुटुंब असे काही अफलातून व्हिडिओ साकारतं की ते पाहून चेहऱ्यावर हसू आल्यावाचून राहणार नाही.

आता तर, त्यांनी भारतातील एका टिकटॉक स्टार जोडीच्या व्हिडिओची प्रशंसाही केली आहे. साक्री तालुक्यातील दिनेश पवार आणि त्यांची पत्नी लखानी पवार याचे व्हिडिओ भारतात बरेच लोकप्रिय आहेत. याच जोडीच्या टिकटॉक व्हिडिओनं आता थेट ऑस्ट्रेलियापर्यंत मजल मारत डेव्हिड वॉर्नरचंही मनं जिंकलं आहे. त्यामुळं त्याचं हे टिकटॉकच्या निमित्तानं असणारं इंडिया कनेक्शन नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. 

पाहा उर्मिला, फुलवानं असा केला 'अनलॉक'चा श्रीगणेशा 

'ये जो तेरी पायलों की....', या गाण्यावर पवार दाम्पत्याला ठेका धरताना पाहून डेव्हिड त्यांच्या या व्हिडिओची न विसरता दाद देत आहे. त्यामुळं सध्या क्रीडा रसिकांपासून टिकटॉक प्रेमींसाठीसुद्धा हा व्हिडिओ कुतूहलाचं विषय ठरत आहे.