साई प्रणीतने जिंकलं थायलंड ओपन ग्रँड प्रिक्स टूर्नामेंटचं जेतेपद

पुरुष वर्गात भारताचा बॅडमिंटन खेळाडू बी. साई प्रणीतने थायलंड ओपन ग्रां प्री टूर्नामेंटचं जेतेपद आपल्या नावे केलं आहे.

Updated: Jun 4, 2017, 06:13 PM IST
साई प्रणीतने जिंकलं थायलंड ओपन ग्रँड प्रिक्स टूर्नामेंटचं जेतेपद title=

नवी दिल्ली : पुरुष वर्गात भारताचा बॅडमिंटन खेळाडू बी. साई प्रणीतने थायलंड ओपन ग्रां प्री टूर्नामेंटचं जेतेपद आपल्या नावे केलं आहे.

प्रणीतने फायनलमध्ये इंडोनेशिया जोनाथन क्रिस्टीचा पराभव केला. प्रणीतने 71 मिनिटात जोनाथन क्रिस्टीचा 17-21, 21-18, 21-19 ने पराभव केला. क्रिस्टीने सेमीफायनलमध्ये मलेशियाच्या जू वेन सूंगचा 21-9, 21-18 ने पराभव केला होता.

पुरुष वर्गात तिसऱ्या क्रमाकांवर असलेल्या प्रणीतने सेमीफायनलमध्ये  पानावित थोंगुनाम याचा 21-11, 21-15 ने पराभव केला होता. हा सामना 36 मिनिटं चालला होता. पानावित याआधी जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचं बोललं जात होतं. पण भारताच्या दिग्गज प्रणीत समोर तो नाही टिकू शकला.