Babar Azam Compares Belly With Umpire Marais Erasmus: बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली पाकिस्तान टीम (Pakistan Team) सध्या इंग्लंडविरूद्ध (Pakistan vs England) टेस्ट सामना खेळतेय. इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 74 रन्सने पराभव झाला. दरम्यान या दोघांच्यात मुल्तानमध्ये दुसरी टेस्ट खेळवली जातेय. दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Social Media Video Viral) झालेला दिसला. यावेळी तो अंपायरसोबत प्रँक करताना दिसला.
टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार बाबर आझम थोडा मस्तीच्या मूडमध्ये दिसून आला. झालं असं की, इंग्लंडच्या डावामध्ये बाबरच्या हातात बॉल आणि तो थेट अंपायरकडे चालत आला. यावेळी बाबर अंपायर Marais Erasmus च्या एकदम बाजूला उभा राहिला आणि त्याच्या पोटाच्या आकारा इतकं पोट फुगवलं.
यानंतर त्याने हलेकच अंपायरच्या पोटावर मारलं आणि तो निघून गेला. त्याने मजा मस्करीत ही गोष्ट केली आहे. दरम्यान बाबरची ही घटना पाहून अंपायरल आणि कॉमेंट्रीटर्स देखील त्यांचं हसू रोखू शकले नाहीत. बाबर आझमचा हा प्रँक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. चाहत्यांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. मात्र आता अनेकांच्या मनात, बाबरच्या या कृत्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार का अशा प्रश्नही उपस्थित होतोय.
Happy king happy me pic.twitter.com/kb4NmmcltS
— Syeda Zirwa Jafferi(Sajoo_09_Sister) (@syeda_zirwa) December 10, 2022
पाकिस्तानच्या टीमला नवा आणि चांगला घातक गोलंदाज मिळाला आहे. हा गोलंदाज म्हणजे अबरार अहमद. अबरार अहमद याचा हा डेब्यू सामना आहे. अबरारने त्याच्या गोलंदाजीच्या जादूने इंग्रजी खेळाडूंची (England team) चांगली दाणादाण उडवली. सुरुवातीच्याच सामन्यात त्याने 7 विकेट्स (7 Wickets) घेतलेत. पहिल्याच सामन्यात पहिल्या दिवशी जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, विल जॅक्स आणि बेन स्टोक्स यांना अबरारने माघारी धाडलं.
उत्तम गोलंदाजी करत उजव्या हाताचा लेगस्पिनर अबरार अहमदच्या नावावर एक मोठा विक्रम केलाय. 24 वर्षांच्या अबरारने टेस्टमध्ये पदार्पण करत पाचहून अधिक बळी घेणारा तो पाकिस्तानचा केवळ 13वा गोलंदाज ठरलाय. मुलतानमध्ये 16 वर्षांनंतर टेस्ट सामन्याचे आयोजन केलं गेलं असून अबरार अहमदने हा सामना पाकिस्तानसाठी संस्मरणीय ठरवलाय.