बबिता फोगटच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

गुडन्यूज ट्विट करत बबिता म्हणाली...   

Updated: Jan 11, 2021, 07:41 PM IST
बबिता फोगटच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

मुंबई : भारताची रेसलर बबिता फोगटच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. बबिता फोगटने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही गोड बातमी खुद्द बबिता फोगटने तिच्या ट्विटर अकाउंटवरून चाहत्यांना दिली आहे. याआधी  अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या घरी मुलीचे आगमन झालं आहे. आज दुपारी ही गोड बातमी विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

गुडन्यूज ट्विट करत बबिता म्हणाली, 'आमच्या SONshineला भेटा. कायम स्वप्नांवर विश्वास ठेवा, स्वप्न पूर्ण होतात. आमची स्वप्न पूर्ण झाले आहेत, ते सध्या निळ्या ड्रेसमध्ये आहे.' असं म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

ट्विटर आपल्या भावना शेअर करत बबिताने तिच्या गोंडस मुलाचा फोटो देखील शेअर केला आहे. बबिता आणि तिच्या चिमुकल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील होत आहे.