close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भारताला १७वे सुवर्णपदक, बजरंगला सुवर्णपदक

गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील नवव्या दिवशी भारताला १७वे सुवर्णपदक मिळालेय. 

Updated: Apr 13, 2018, 01:32 PM IST
भारताला १७वे सुवर्णपदक, बजरंगला सुवर्णपदक

गोल्ड कोस्ट : गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील नवव्या दिवशी भारताला १७वे सुवर्णपदक मिळालेय. ६५ किलो वजनी फ्रीस्टाईल वजनी गटात भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलेय. फायनलमध्ये त्याने वेल्सच्या केन चॅरिगला चीतपट करत भारताला दिवसातील तिसरे गोल्ड मेडल मिळवून दिले.

याआधी नेमबाजीत भारताने नवव्या दिवशी दोन सुवर्णपदके पटकावली होती. याआधी नेमबाजीत भारताची तेजस्विनी सावंत हिने 457.9 गुण मिळवत सुवर्णपदकावर कब्जा केला होता. तर अंजुमने  455.7 गुणांसह रौप्य पदक मिळवले. 

दुसरीकडे मौसम खत्रीही फायनलमध्ये पोहोचलाय. तर महिलांमध्ये पूजा धांदानेही फायनलमध्ये बाजी मारलीये. १७व्या सुवर्णपदकासह ८ रौप्य आणि ११ कांस्यपदकांसह भारताच्या खात्यात ३६ पदके जमा झालीत.