कुस्तीपटू बजरंग पूनियाला 'सुवर्ण'; विंग कमांडर अभिनंदन यांना समर्पित

भारतीय कुस्तीपटू बजरंग पूनिया आणि पूजा ढांडाने सुवर्ण तर साक्षी मलिकने कांस्य पदक पटकावले आहे.

Updated: Mar 3, 2019, 06:14 PM IST
कुस्तीपटू बजरंग पूनियाला 'सुवर्ण'; विंग कमांडर अभिनंदन यांना समर्पित

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू बजरंग पूनिया आणि पूजा ढांडा यांनी डान कोलोव-निकोला पेट्रोव इंटरनॅशनल सीरीजमध्ये आपापल्या वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. शनिवारी रात्री झालेल्या पुरूष ६५ वजनी गटात अमेरिकेच्या जॉर्डन मायकल ओलिवरला पराभूत करत सुवर्ण पदक आपल्या नावे केले. खेळाच्या सुरूवातील बजरंग ०-३ ने पिछाडीवर होता. परंतु त्यानंतर जबरदस्त खेळी करत अमेरिकेच्या जॉर्डन मायकल ओलिवरला १२-३ ची आघाडी करत चांगलीत मात दिली. या विजयानंतर 'मी हे पदक विंग कमांडर अभिनंदन यांना समर्पित करत असल्याचे सांगितले. त्यांनी मला खुप प्रभावित केले आहे. मला त्यांना भेटण्याची आणि त्यांनाशी हात मिळवण्याची इच्छा असल्याचे' बजरंगने म्हटले आहे.

बजरंग पूनिया याच्या आधी रियो ऑलिंम्पिकची कांस्य पदक विजेता साक्षी मलिकने ६५ किलो वजनी गटात रौप्य पदक आणि पूजाने ५९ वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. साक्षीचा ६५ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये स्वीडनच्या हेना जोहानसनकडून ३-८ ने पराभव झाला होता. तर सेमीफायनलमध्ये साक्षीने वर्ल्ड चॅम्पियन पेट्रा ओली हीला पराभूत केले होते.

५९ किलो फ्रिस्टाईल वर्गात वर्ल्ड चॅम्पियनशिप -२०१८ ची कांस्यपदक विजेती पूजाने सुवर्ण पदक मिळवले. पूजाने हमवतन सरिता मोर, लिथुआनियाची कोरनेलिजा जैयसेवेयूटे आणि किर्गिस्तानच्या एसुलु टिनबेकोवा या तिनही स्पर्धकांचा पराभव केला.