'या' खेळाडूला मिळाली टीम इंडियात खेळण्याची संधी

6 मार्च 2018 पासून पुन्हा एकदा टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर आहे.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Mar 5, 2018, 07:49 AM IST
'या' खेळाडूला मिळाली टीम इंडियात खेळण्याची संधी  title=

मुंबई : 6 मार्च 2018 पासून पुन्हा एकदा टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर आहे.

6 मार्च ते 18 मार्च दरम्यान भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात निडास ट्रॉफी खेळली जाणार आहे. या सिरीजसाठी टीममध्ये 6 सिनियर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे तर काही नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. 

महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव सारखे मोठे खेळाडू या सामन्यांत सहभागी नाही. यावेळी विराट कोहलीची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवली आहे. यावेळी या संघात संधी मिळाली आहे अनेक खेळाडूंना. त्यांनी आपण आपले 110 टक्के या खेळासाठी देऊ असे म्हटले आहे. 

यावेळी मिळाली या खेळाडूला संधी 

बडौदामधील युवा खेळाडू दीपक हुड्डाला यामध्ये संधी मिळाली आहे. श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या आगामी टी 20 ट्राय सिरीजमध्ये त्याला इंटरनॅशनल डेब्यू करण्याची संधी मिळाली आहे. रोहतकमध्ये जन्मलेला 22 वर्षाचा हुड्डा डिसेंबरमध्ये श्रीलंकेच्या विरूद्ध तीन सामन्यात टी -20 सिरीजमध्ये खेळण्याची निवडलं गेलं मात्र प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नाही.

हुड्डाला 6 मार्चपासून सुरू होणाऱ्या या सिरीजमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. हुड्डाने सांगितलं की, ही महत्वाची सिरीज आहे. पहिल्या सिरीजमध्ये मला खेळण्याची संधी मिळाली नाही. मला आशा आहे, या सिरीजमध्ये मला खेळायची संधी मिळेल. मी माझे संपूर्ण 110 टक्के देणार आहे.