विराट-रोहितमध्ये सर्व काही आलबेल- भरत अरुण

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याची चर्चा.

Updated: Jul 26, 2019, 04:17 PM IST
विराट-रोहितमध्ये सर्व काही आलबेल- भरत अरुण title=

मुंबई : टीम इंडियाचा वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पराभव झाला. यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याची चर्चा पाहायला मिळाली. या दोघांमध्ये अनेक वाद असल्याच्या चर्चा देखील रंगू लागल्या होत्या. आता या प्रकरणावर टीम इंडियाचे बॉलिंग कोच भरत अरुण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विराट-रोहित यांच्याबद्दल पसरवण्यात आलेल्या सर्व गोष्टी या अफवा आहेत. या दोघांमध्ये चांगले संबंध आहेत.  

स्टार स्पोर्ट्स सोबत बोलत असताना भरत अरुण यांनी म्हटलं की, 'रोहित-विराटमध्ये वाद असणे हे अशक्य आहे. रोहित नेहमीच विराटसोबत अनेक विषयांवर चर्चा करतो. त्या दोघांमध्ये चांगल्या प्रकारचे संबंध आहेत. ते दोघे नेहमीच एकमेकांची स्तुती आणि कौतुक करतात. विराट टीम इंडियाचं चांगल्या प्रकारे नेतृत्व करत आहे. टीम इंडियामधील वातावरण अनुकूल आहे'.  

'टीमसाठी कोणत्याही विषयावर चर्चा करताना सर्वांची संमती घेतली जाते. तसेच त्याबद्दल कल्पना दिली जाते. टीममधील प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची संधी दिली जाते. सर्वच विषयांवर टीममधील सर्वांच नेहमीच एकमत असतं असे नाही. पण टीममधील सर्वच प्लॅनिंग बद्दल चर्चा करुन प्रत्येक जण आपली मतं व्यक्त करतात, असे देखील भरत अरुण म्हणाले.

दरम्यान टीम इंडियाच्या वर्ल्ड कपमधील पराभवानंतर टीममध्ये दोन गट पडल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे पराभवानंतर टीम इंडियाच्या आधी रोहित शर्मा भारतात दाखल झाला होता. त्यामुळे अफवांवरील चर्चेमुळे लोकांचा विश्वास दृढ झाला होता.