close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मतभेत पुन्हा आले समोर, रोहितने विरुष्काला केलं अनफॉलो

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेत

Updated: Jul 26, 2019, 02:53 PM IST
मतभेत पुन्हा आले समोर, रोहितने विरुष्काला केलं अनफॉलो

मुंबई : इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद झाल्याचं बोललं जातं आहे. माहितीनुसार विराट आणि रोहित गेल्या काही दिवसांपासून एकमेकांशी बोलत नाहीत. इंस्टाग्रामवर रोहितने विराट आणि अनुष्काला अनफॉलो केल्याचं देखील समोर आलं आहे. यावर क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रोहित शर्माने फक्त विराट कोहलीसह त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माला देखील अनफॉलो केलं. काही खेळाडूंनी वर्ल्डकपदरम्यान एका खेळाडूवर 'फॅमिली क्लॉज' तोडण्याचा आरोप लावला आहे. या खेळाडून बोर्डाचा नियम मोडल्याचा आरोप आहे. कुटुंबाला १५ दिवस सोबत ठेवण्याचा नियम तोडल्याने काही खेळाडूंनी यावर आक्षेप घेतला आहे. तर अनुष्का शर्माने ही यावर नाराजी व्यक्त केली आहे.

रोहित शर्माने अनुष्का शर्माला अनफॉलो केल्यामुळे एक गोष्ट समोर आली आहे की, फक्त मैदानातच नाही तर मैदानाच्या बाहेर देखील दोघांमध्ये मतभेद आहेत. मतभेदामध्ये खेळाडूंच्या कुटुंबाला आणलं जाणं हे योग्य नाही.