CSK च्या क्रिकेटरची पत्नी बोल्ड फोटोमुळे चर्चेत, सोशल मीडियावर फोटो Viral

बोल्ड फोटोमुळे चर्चेत आहे या क्रिकेटरची पत्नी... 

Updated: Jun 26, 2022, 06:50 PM IST
CSK च्या क्रिकेटरची पत्नी बोल्ड फोटोमुळे चर्चेत, सोशल मीडियावर फोटो Viral title=

मुंबई : भारतीय संघातील क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. चाहतेही सोशल मीडियावर त्यांना फॉलो करतात. पण आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळणारा वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होची मैत्रीण जोसना गोन्साल्विसही (Josanna Gonsalves) खूप सुंदर आहे आणि सोशल मीडियावर ती चर्चेत असते.

खिता या नावाने प्रसिद्ध असलेल्या ड्वेन ब्राव्होची पत्नी जोसना गोन्साल्विस ही एक व्यावसायिक शेफ आहे आणि तिच्या कारकिर्दीसोबत कुटुंबाला खूप गांभीर्याने घेते.

हॉटनेसमध्ये जोसना गोन्साल्विसने बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींना मागे टाकले. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे फोटो शेअर करत असते.

जोसना गोन्साल्विस आणि ड्वेन ब्राव्हो यांना एक मुलगा आहे. जोसनाने ब्राव्होच्या मुलाला जन्म दिल्यानंतर, ती इटालियन खाद्यपदार्थात करिअर करण्यासाठी इटलीतील एका छोट्या गावात राहायला गेली.

जोसना गोन्साल्विस देखील एक व्यावसायिक शेफ बनण्यासाठी फ्रान्समध्ये इंटर्नशिपसाठी गेली होती. ड्वेन ब्रावोसोबतचे तिचे अनेक फोटोही ती शेअर करत असते.

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेतली आहे. तो धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2022 मध्ये खेळला होता. तो जगभरातील T20 आणि T10 क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसतो.