खास शेजाऱ्यांकडून 'विरुष्का'साठी पोहोचला घरचा डब्बा

पाहा शेजारधर्म कसा जपतेय ही सेलिब्रिटी जोडी   

Updated: Jul 8, 2020, 03:18 PM IST
खास शेजाऱ्यांकडून 'विरुष्का'साठी पोहोचला घरचा डब्बा
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री anushka sharma अनुष्का शर्मा आणि तिचा पती virat kohli विराट कोहली गेल्या बऱ्याच दिवसांपासून मुंबईतील त्यांच्या घरी वास्तव्यास आहेत. coronavirus कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विरुष्काही त्यांच्या या आशियान्यामध्ये लॉकडाऊनचा काळ व्यतीत करत आहेत. असं असतानाच या जोडीसाठी त्यांच्या एका खास शेजाऱ्यानं तितकाच खास असा घरचा डब्बा पाठवला आहे. 

खुद्द विराटनंच सोशल मीडियावर या शेजाऱ्यासोबतचा फोटो पोस्ट करत त्याचे आभारही मानले आहेत. विराट आणि अनुष्काचे शेजारी कोण, असाच प्रश्न तुम्हाला पडला ना? 

लॉकडाऊन म्हणा किंवा अनलॉकचा टप्पा म्हणा, या अतिशय अनपेक्षित परिस्थितीमध्ये विरुष्कासाठी डब्बा घेऊन पोहोचला आहे, भारतीय क्रिकेट संघातीलच एक खेळाडू. विराट आणि अनुष्काच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर राहणारा हा खेळाडू आहे, श्रेयस अय्यर. 

श्रेयसनं घरातून बनवून आणलेल्या या खास खाद्यपदार्थाविषयी आभार मानत विराटनं लिहिलं, 'आमच्या घरापासून अवघ्या ५०० मीटरच्या अंतरावर असणाऱ्या या अतिशय प्रेमळ शेजाऱ्यानं आमच्यासाठी घरी बनवलेला नीर डोसा आणत आमच्या चेहऱ्यावर आनंद आणला. तुझ्या आईचे मी याबाबत खूप सारे आभार मानतो. कारण इतके चवीष्ट डोसे आम्ही यापूर्वी बऱ्याच काळापासून खाल्ले नव्हते. मी आशा करतो की तुला आम्ही दिलेली मश्रूम बिर्यानी आवडली असेल, श्रेयस'. 

 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

 

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत विराटनं श्रेयसोबतचा हा फोटो पोस्ट केला. जो पाहून युझवेंद्र चहलनं त्यावर कमेंट करत जरा आमच्या घरीसुद्धा मश्रूम बिर्यानी पाठवून द्या, मी फक्त १४०० किलोमीटर दूर राहतो असं म्हटल्याचं पाहायला मिळालं. काय मग, क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या या खेळाडूंचा शेजारधर्म तुम्हाला कसा वाटला?