Boxing day Test: बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे नक्की काय असतं? 26 डिसेंबरचं कनेक्शन काय?

Boxing Day Test, AUS vs SA: आंतरराष्ट्रीय स्थरावर पहिला बॉक्सिंग डे टेस्ट 1950 साली खेळला गेला होता. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या (Aus Vs Eng) अॅशेसच्या सिरीजमध्ये हा (The Ashes Cricket series) सामना खेळला जातो.

Updated: Dec 26, 2022, 06:43 PM IST
Boxing day Test: बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे नक्की काय असतं? 26 डिसेंबरचं कनेक्शन काय? title=
Boxing Day Test

AUS vs SA 2nd Test: ऑस्ट्रेलिया आणि साऊथ अफ्रिकेमध्ये (AUS vs SA) तीन सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना (AUS vs SA 2nd Test) आजपासून मेलबर्नच्या मैदानावर (Melbourne Cricket Ground) खेळला जात आहे. सामना काहीसा खास ठरतो 'बॉक्सिंग डे टेस्ट' या नावामुळे... बॉक्सिंग डे टेस्टला (Boxing Day Test) मैदान खचाखच भरलेलं असतं. तर अनेक क्रिकेटप्रेमी हा सामना पाहण्यासाठी आतुर असतात. बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे नक्की काय असतं? आणि 26 डिसेंबरचं कनेक्शन (December 26) काय? असा सवाल सर्वांनाच पडल्याचं पहायला मिळतंय. (Boxing Day Test What is it and why is it played post Christmas on December 26 marathi news)

बॉक्सिंग डे टेस्ट हा शब्द खासकरून ऑस्ट्रेलिया (Aus), न्यूझीलंड (Nz) आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (SA) होणाऱ्या टेस्ट मॅचसाठी संबोधला जातो. वर्षाच्या अखेरीस या तीन संघासोबत खेळल्या जाणाऱ्या अखेरच्या टेस्टला बॉक्सिंग डे सामन्याला म्हटलं जातं. बॉक्सिंग डे म्हणजे ख्रिसमसच्या (Christmas) पुढचा दिवस. प्रत्येक वर्षी ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ऑस्ट्रेलिया 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) एक टेस्ट मॅच खेळवली जाते. हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी असल्याचं पहायला मिळतं.

बॉक्सिंग डे टेस्ट सामना हा खास त्यांच्यासाठी ठेवला जातो, जी लोकं ख्रिसमसच्या दिवशी (25 Dec) देखील सुट्टी न घेता काम करतात. बॉक्सिंग डे विषयी अनेक कहाण्या सांगितल्या जातात. बॉक्सिंग डेला रोमन कालखंड किंवा ईसाई कालखंडापासून सुरुवात झाल्याची माहिती समोर येते. 1892 साली पहिल्यांदा बॉक्सिंग डे सामना (Boxing Day Test 1st Match) खेळला गेला होता. ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत टुर्नामेंटमध्ये हा सामना खेळवला गेला होता. 

आंतरराष्ट्रीय स्थरावर पहिला बॉक्सिंग डे टेस्ट 1950 साली खेळला गेला होता. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या (Aus Vs Eng) अॅशेसच्या सिरीजमध्ये हा (The Ashes Cricket series) सामना खेळला जातो. टीम इंडियाने (Team India) आत्तापर्यंत 9 बॉक्सिंग डे सामने खेळले आहेत. भारताने अखेरचा बॉक्सिंग डे सामना 2020 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.

आणखी वाचा - AUS vs SA: चीते की चाल, बास की नजर आणि लाबुशेनचा कॅच... थक्क करणारा Video पाहाच!

दरम्यान, सध्या ऑस्ट्रेलिया आणि साऊथ अफ्रिकेमध्ये (Aus vs Sa) सुरू असलेल्या सिरीजमध्ये (Boxing Day Test 2022) दुसऱ्या सामना हा बॉक्सिंग डे टेस्ट सामना ठरला आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दबदबा राहिला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर साऊथ अफ्रिकेच्या (SA) फलंदाजांनी नांग्या टाकल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे पहिल्या दिवशी बॅकफूटवर गेलेली साऊथ अफ्रिका पुन्हा कमबॅक करणार की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.