नवी दिल्ली: इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात कमबॅक करत मोठा विजय मिळवला. नॉटिंघम टेस्टमध्ये इंग्लंडचा 203 रनने पराभव झाला. नॉटिंघम टेस्टमध्ये विजय हा कर्णधार विराट कोहलीसाठी मोठा होता. कोहलीने भारतीय कर्णधार म्हणून आपल्या 22व्या टेस्ट सामन्यात विजय मिळवला आहे. यासोबतच कोहलीने सौरव गांगुलीला देखील मागे टाकलं आहे.
विराट कोहली सर्वाधिक सामने जिंकणारा भारतीय कर्णधार म्हणून दुसऱ्या स्थानावर आहे. महेंद्र सिंह धोनी 27 विजयांसह भारतीय कर्णधार म्हणून पहिल्या स्थानावर आहे. कोहली या रेकॉर्डपासून 5 सामने दूर आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत 38 टेस्ट सामने खेळले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार झाल्यानंतर त्याने 22 सामने जिंकले आहेत. टेस्ट सामन्यात कर्णधार विराट कोहली इंग्लंडच्या मायकल वॉनसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींग 30 विजयांसह पहिल्या स्थानावर आहे. स्टीव वॉ देखील 27 सामन्यांमध्ये विजयासह दुसऱ्या स्थानावर आहे.
भारत आणि इंग्लंडमध्ये चौथा सामना 30 ऑगस्टला साउथहॅम्पटन मध्ये खेळला जाणार आहे. चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठीची टीम देखील घोषित झाली आहे. या टीममध्ये 2 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मुरली विजयला संघातून वगळण्यात आलं आहे. कुलदीप यादव याला देखील एक अतिरिक्त बॅट्समन संघात घेऊन संघातून काढण्यात आलं आहे.
भारताला अंडर-19 वर्ल्डकप जिंकवणारा 18 वर्षाचा पृथ्वी शॉ आणि आंध्र प्रदेशच्या 24 वर्षीय ऑल राउंडर हनुमा विहारीचा संघात स्थान देण्यात आलं आहे.