एक हाथ ही काफी है! स्टिव स्मिथला आऊट करत खेळाडूनं एका हाताने घेतला कॅच...व्हिडीओ

स्टिव स्मिथला आऊट करण्यासाठी घेतलेला कॅच तुम्ही मिस तर केला नाही? या खेळाडूनं पकडलेला कॅचचा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल व्वा जबरदस्त! 

Updated: Oct 30, 2021, 11:17 PM IST
एक हाथ ही काफी है! स्टिव स्मिथला आऊट करत खेळाडूनं एका हाताने घेतला कॅच...व्हिडीओ

दुबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड टी 20 वर्ल्ड कपसाठी सामना सुरू आहे. या सामन्यात जबरदस्त कॅच पाहायला मिळाला आहे. डाईव्ह मारून नाही चक्क एका हाताने खेळाडूनं कॅच घेत स्टिव स्मिथला आऊट केलं आहे. ह्या जबरदस्त कॅचचा व्हिडीओ तुम्ही जर मिस केला असेल तर तो खरंच पाहण्यासारखा आहे. 

ऑस्ट्रेलिया संघाच्या तिसऱ्या ओवरमध्ये क्रिस जॉर्डन गोलंदाजी करत होता. ओवरचा पहिलाच बॉल होता. त्याने टाकल्यावर स्टिव स्मिथने आपल्या धडाकेबाज स्टाईलनं तो मारला खरा पण चौकार किंवा षटकार जाण्या ऐवजी थेट खेळाडूच्या हातात बॉल पडला. 

ख्रिस वॉक्सने एका हाताची कमाल दाखवत स्टिव स्मिथने टोलवलेला बॉल पकडला. त्याचा कॅच सुटलाही नाही. स्टिव स्मिथ आऊट झाला. त्याने घेतलेल्य़ा कॅचची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. अनेकांनी त्याचं कौतुकही केलं आहे. 

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर असा कॅच घेणं किती कठीण असेल हे लक्षात येईल. तो कॅच पकडण्यासाठी वोक्सला मागे धावावं लागलं. इतकच नाही तर तो हातातून सुटणार नाही याची काळजीही घ्यावी लागली. वोक्सने घेतलेल्या या कॅचवर अनेकांना आश्चर्य देखील वाटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x