टी20 वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, शिखर धवननंतर आणखी एका खेळाडूचा अलविदा

Dawid Malan Retirement : टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकालीय. आता दोन दिवसातच आणखी एका खेळाडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. 37 व्या वर्षी त्याने हा निर्णय घेतलाय.   

राजीव कासले | Updated: Aug 28, 2024, 03:43 PM IST
टी20 वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, शिखर धवननंतर आणखी एका खेळाडूचा अलविदा title=

Dawid Malan Retirement : टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकालीय. आता दोन दिवसातच आणखी एका खेळाडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचा (England Cricket Team) आक्रमक फलंदाज आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर वन राहिलेल्या डेव्हिड मलानने (Dawid Malan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडण्याचा निर्णय (Retirement) घेतला आहे. डाव्याचा हाताचा आक्रमक फलंदाज डेव्हिड मलानने क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये इंग्लंड संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2023 मध्ये इंग्लंडसाठी तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या मेन्स हंड्रेड स्पर्धेतही मलान खेळला होता. 

तीनही फॉर्मेंटमध्ये शतक
डेव्हिडि मलान इंग्लंडसाठी 22 कसोटी, 30 एकदिवसीय आणि 62 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलाय. इंग्लंडच्या मोजक्याच खेळाडूंपैकी मलान एक आहे ज्याच्या नावावर क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये शतकाचा समावेश आहे. याआधी हा विक्रम केवळ जोस बटलरच्या नावावर आहे. गेल्या वर्षी भारतात झालेल्या आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये डेव्हिड मलान इंग्लंड संघातून खेळला होता. पण यानंतर त्याला इंग्लंड संघात संधी मिळाली नाही. ऑस्ट्रेविरुद्धच्या आगामी व्हाईट बॉल मालिकेतूनही डेव्हिड मलानला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर मलानने निवृत्तीचा निर्णय घेतला. 

डेव्हिड मलान इंग्लंडसाठी शेवटचा भारतात झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. या स्पर्धेत त्याने 9 सामन्यात 404 धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडतर्फे सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला होता. 

मलानची क्रिकेट कारकिर्द
डेव्हिड मलान इंग्लंडसाठी 22 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 1074 धावा केल्या असून 1 शतक आणि 9 अर्धशतकं त्याच्या नावावर आहे. कसोटी क्रिकेमटमध्ये 146 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मलानने 30 सामन्यात 1450 धावा केल्या असून यात 6 शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. 140 हा त्याचा सर्वोत्तम स्कोर आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 62 सामन्यात 1892 धावा केल्या असून यात 1 शतक आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे. 103 ही त्याची टी20 मधील सर्वोत्तम धावसंख्या आहे. 

2017 मध्ये पदार्पण
डेव्हिड मलानने 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने 44 चेंडूत 78 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये पर्थवर त्याने जॉनी बेअरस्टोबरोबर 227 चेंडूत त्याने 140 धावांची शतकी भागिदारी केली आहे. टी20 क्रिकेटमधला आक्रमक फलंदाज अशी डेव्हिड मलानची ओळख होती. 

टी20 क्रमवारीत नंबर वन
सप्टेंबर 2020 मध्ये मलानने T20 क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं होतं. 2022 मध्ये टी20 विजेत्या इंग्लंड संघाचाही तो भाग होता.