आताची मोठी बातमी! S Sreesant पुन्हा अडचणीत, फसवणूकीच्या आरोपात FIR दाखल

S Sreesanth : टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. केरळातल्या कन्नूरमध्ये श्रीसंतविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. श्रीसंतवर फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 23, 2023, 08:54 PM IST
आताची मोठी बातमी! S Sreesant पुन्हा अडचणीत, फसवणूकीच्या आरोपात FIR दाखल title=

S Sreesanth : टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत क्रिकेटपेक्षा वादामुळेच अधिक चर्चेत राहिलाय. आता पुन्हा एकदा तो नव्या वादात अडकला आहे. केरळ पोलिसांनी (Kerala Police) एस श्रीसंत आणि अन्य दोघांविरोधात FIR दाखल केला आहे. केरळमधल्या कन्नूर जिल्ह्यात एका व्यक्तीने श्रीसंत आणि इतर दोघांविरोधात फसवणूकीची तक्रा केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एस श्रीसंत आणि इतर दोघांविरोधात कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात श्रीसंतला आरोपी जाहीर करण्यात आलं आहे. 

क्रिकेट अकॅडमीशी संबंधीत प्रकरण
कन्नूर जिल्ह्यातील (Kannur) चूंडा इथे राहणारे सरीश गोपालन यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आरोपी राजीव कुमार आणि वेंकटेश किनी या दोघआंनी 25 एप्रिल  2019 आतापर्यंत आपल्याकडून 18.70 लाख रुपये उकळले. राजीव आणि वेंकटेश यांनी कर्नाटकमधल्या कोल्लूर इथं एक क्रीडा अकॅडमी उघडण्याचं आश्वासन दिलं होतं. यात भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंतही भागिदार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सरीश गोपालने यांनी पैशांची गुंतवणूक केली. पण त्यानंतर अकॅडमीच्या नावाखाली केवळ पैसे उकळण्यात आले. यात श्रीसंतचाही सहभाग असल्याचा आरोप सरीश गोपालन यांनी केला आहे. या आधारे श्रीसंतला आरोपी घोषित करण्यात आलं आहे. 

एस श्रीसंतवर आली होती बंदी
एस श्रीसंत याआधीही अनेकवेळा वादात अडकला आहे. आयपीएल 2013 मध्ये कथित स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतेवर आजीवन बंदी घालण्यात आली. पण त्यानंतर 2020 मध्ये बीसीसीआयने ही बंदी सात वर्षांपर्यंत कमी केली. यानंतर श्रीसंतने केरळसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. सध्या श्रीशंत लिजेंड्स लीग क्रिकेट (LLC) 2023 मध्ये खेळत आहे. 

टीम इंडियाच्या 2007 टी20 वर्ल्ड कप विजयात एस श्रीसंत यांनी महत्वाची भूमिाक बजावली. टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात एस श्रीसंतने मिसबाह-उल-हकचा शानदार झेल टीपला होता. त्यामुळे टीम इंडियाने पहिल्या वहिल्या टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. हा झेल क्रिकेटप्रेमींच्या मनात आजही कायम आहे. श्रीसंत टीम इंडियासाठी 27 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 10 टी20 सामने खेळला आहे. यात त्याने 169 विकेट घेतल्यात. 

श्रीसंतचा आयपीएल रेकॉर्ड
आयपीएलमध्ये श्रीसंतने किंग्स इलेव्हन पंजाबकडून पदार्पण केलं. यानंतर तो कोच्ची टस्कर्स आणि राजस्थान रॉयल्स संघासाठीही खेळला. श्रीसंतने 44 आयपीएल सममन्यात 40 विकेट घेतल्यात.