या अभिनेत्याला डेट करण्याचं महिला क्रिकेटर स्मॄती मंधानाचं स्वप्न

भारतीय महिला क्रिकेट टीमची सलामी फलंदाज स्मृती मंधाना सध्या तिच्या खेळामुळे नाही तर वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. शनिवारी स्मृती एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी चर्चा करताना तिने सांगितले की, ती क्रिकेटचा देव मानल्या जाणा-या सचिन तेंडुलकरला नाही तर कर्णधार मिताली राज हिला आदर्श मानते. 

Updated: Sep 18, 2017, 12:27 PM IST
या अभिनेत्याला डेट करण्याचं महिला क्रिकेटर स्मॄती मंधानाचं स्वप्न title=

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट टीमची सलामी फलंदाज स्मृती मंधाना सध्या तिच्या खेळामुळे नाही तर वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. शनिवारी स्मृती एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी चर्चा करताना तिने सांगितले की, ती क्रिकेटचा देव मानल्या जाणा-या सचिन तेंडुलकरला नाही तर कर्णधार मिताली राज हिला आदर्श मानते. 

महिला क्रिकेट टीमने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक दिल्यानंतर टीम चर्चेत आली होती. भलेही टीमला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला, पण त्यांनी अनेकांची मने जिंकली. त्यांच्यावर अनेक बक्षीसांची बरसातही करण्यात आली. 

याच कार्यक्रमात तिने तिला आवडणारा बॉलिवूड अभिनेता कोण याचाही खुलासा केला. स्मृतीला शाहरूख, सलमान किंवा आमिर नाही तर अभिनेता हृतिक रोशन पसंत आहे. इतकेच नाही तर हृतिकसोबत डेट ला जाण्याची तिची इच्छाही तिने बोलून दाखवली. तर स्मॄतीला अरिजीत सिंह हा गायक आवडतो. 

यासोबतच इंडियन प्रिमिअर लीगबाबत बोलताना ती म्हणाली की, ‘महिला आयपीएल एक खास गोष्ट आहे. यात देशातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळेल. मला आशा आहे की, बीसीसीआय याबाबतीत विचार करतील’.