बाप बाप होता है! पाकिस्तानला भारतीय क्रिकटपटूकडून दणका

भारतीय क्रिकेटपटूकडून पाकिस्तानी पत्रकराची बोलती बंद, पाहा नेमकं काय घडलं

Updated: Mar 20, 2022, 04:57 PM IST
बाप बाप होता है! पाकिस्तानला भारतीय क्रिकटपटूकडून दणका title=

मुंबई : आयपीएलचे सामने 26 मार्चपासून खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना चेन्नई विरुद्ध कोलकाता होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आयपीएल विरुद्ध पाकिस्तान सुपर लीगवरून सोशल मीडियावर बरेच वाद होत आहेत. रमीज राजा यांनी थेट आयपीएल आणि बीसीसीआयला आव्हान दिलं आहे. 

 पाकिस्तान आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे भविष्यात PSL आयपीएलला टक्कर देईल असा दावा त्यांनी केला. तेव्हा क्रिकेटपटू आयपीएल नाही तर PSL खेळायला येतील असा दावा त्यांनी केला होता.

या प्रकरणी पाकिस्तान पत्रकाराने ट्वीट करून वक्तव्य केलं मात्र भारतीय खेळाडूनं त्या ट्वीटला जबरदस्त उत्तर देऊन त्याचं तोंड बंद केलं आहे.  IPL की PSL कोणती लीग सर्वात जास्त चांगली आहे ? यावर सोशल मीडियावर चर्चा होत आहेत. दोन्ही लीगची तुलना करणारं ट्वीट पाकिस्तानच्या पत्रकारानं केलं. यावेळी त्याने आयपीएलवर निशाणा साधला.

पाकिस्तान लीग आणि आयपीएल यांची तुलनाच होऊ शकत नाही. पाकिस्तान सुपर लीग 2016 पासून सुरू आहे. तर आयपीएल 2008 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. आयपीएलच्या तुलने पाकिस्तान सुपर लीगनेही तेवढीच लोकप्रियता मिळवली आहे. 

आयपीएल तेव्हा सुरू झालं होतं जेव्हा आयपीएलला मार्केटमध्ये दुसरं कोणीच प्रतिस्पर्धी नव्हतं. आता मात्र खूप जास्त लीग आहेत असंही पुढे पाकिस्तान पत्रकार म्हणाला. पाकिस्तानी पत्रकाराचं संपूर्ण म्हणणं पाहिल्यानंतर रॉबिन उथप्पाने त्याला चार शब्दात उत्तर दिलं आहे. 

पाकिस्तानच्या पत्रकाराचं हे बोलणं न आवडल्याने रॉबिन म्हणाला की, तुम्ही ज्या मार्केटची चर्चा करताय ते मार्केट आयपीएलने निर्माण केलं. यावर पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद झाली. यंदा आयपीएल 2022 मध्ये रॉबिन उथप्पा चेन्नई संघातून खेळताना दिसणार आहे. 

यंदा 10 संघ 74 सामने आणि दोन स्थळ शिवाय आयपीएलचं टायटल स्पॉन्सर अशा अनेक विविध गोष्टी आयपीएलमध्ये आहेत. यंदाचं आयपीएल अनेक अर्थांनी वेगळं असणार आहे. 70 सामने मुंबई-पुण्यातील 4 स्टेडियमध्ये खेळवण्यात येणार आहेत. तर चेन्नई विरुद्ध कोलकाता संघ पहिला सामना होणार आहे.