close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

CWG 2018 : भारताची ४ सुवर्ण पदकांची कमाई

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने दहाव्या दिवशी आज चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 14, 2018, 12:24 PM IST
CWG 2018 : भारताची ४ सुवर्ण पदकांची कमाई

गोल कोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने दहाव्या दिवशी आज चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. बॉक्सिंगमध्ये मेरी कोम आणि गौरव सोळंकीचा सुवर्ण ठोसा लगावला. नेमबाजीत संजीव राजपूत आणि भालाफेकीत नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी केली. भारताकडे आत्तापर्यंत २१ सुवर्ण पदके झाली आहेत. तर दुसरीकडे  राष्टकुल स्पर्धेत भारताचं अनोख्या लढतीकडे लक्ष असणारआहे. बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल आमनेसामने आल्या आहेत. त्यामुळे भारताला आणखी एक पदक मिळणार आहे.

CWG 2018 : दहाव्या दिवशी तीन सुवर्ण, एका रौप्य पदकाची कमाई

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळालंय. मेरी कोमनं भारताला सुवर्णपदक मिळवून दिलंय. ४८ किलो वजनी गटात मेरी कोमनं ही सुवर्ण कमाई केलीय. अंतिम फेरीत मेरी कोमनं क्रिस्टिना ओहारावर मात केलीय. मेरी कोमच्या या सुवर्ण कमाईमुळे भारताच्या खात्यात ४३ पदकं झालीत. यांत २१ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. पहिले बॉक्सिंगमध्ये मेरी कॉमने सुवर्णपदक पटकाविल्यानंतर आता नेमबाज संजीव राजपूत, बॉक्सिंगमध्ये गौरव सोळंकी आणि कुस्तीपटू सुमित मलिकने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

नेमबाज संजीव राजपूतने ५०  मीटर ३ रायफल पोजिशनमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. बॉक्सिंगप्रकारात गौरव सोळंकीने ५२  किलोवजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली.  उत्तर आयर्लंडचा ब्रेंडन इरविनचा पराभव करत गौरवने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यामुळे भारताची आजची सकाळ सुवर्णमय अशीच झाली.

 

 

मेरी कोमचा गोल्डन पंच