क्रिकेट सोडून David Warner कुस्तीच्या आखाड्यात? साऊथचा फिव्हर अन् जबरदस्त अ‍ॅक्शन सीन!

David Warner Viral Video : डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो. खासकरून त्याला भारतीय सिनेमांचं आकर्षण आहे. अशातच त्याने एक व्हिडिओ (David Warner Instagram Video) शेअर केलाय.

Updated: Feb 26, 2023, 10:48 PM IST
क्रिकेट सोडून David Warner कुस्तीच्या आखाड्यात? साऊथचा फिव्हर अन् जबरदस्त अ‍ॅक्शन सीन! title=
David Warner Viral Video

David Warner Viral Video:  ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) भारतात आला की तो भारताच्या रंगात रंगून जातो. भारतासोबत त्याचं एक वेगळं नातं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यातील कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेत जखमी झाल्याने वॉर्नर आता ऑस्ट्रेलियाचा रस्ता पकडणार आहे. अशातच आता क्रिकेट सोडून वॉर्नर कुस्तीच्या आखाड्यात उतरल्याचं पहायला मिळतंय.

David Warner चा video व्हायरल

डेव्हिड वॉर्नरला बॉलिवूड सिनेमाचं (Bollywood movies) वेड लागलंय. काही दिवसांपासून डेव्हिड वॉर्नरने इन्स्टाग्रामवर (David Warner Instagram) शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचा एक व्हिडिओ (David Warner Video) शेअर केला होता. त्यानंतर आता वॉर्नरवर साऊथचा फिव्हर चढला आहे. वॉर्नरने प्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेता विक्रमचा (Vikram) ॲक्शन सीन करत असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. हा ॲक्शन सीन 'आय' चित्रपटातील असल्याचं पहायला मिळतंय.

आणखी वाचा - ना KL Rahul ना Suryakumar, कोण होणार टीम इंडियाचा उपकर्णधार? हरभजन सिंग म्हणतो...

डेव्हिड वॉर्नरला भारतीय सिनेमाचं क्रेझ

डेव्हिड वॉर्नरने चित्रपटाच्या सीनमध्ये विक्रमच्या ऐवजी स्वतःचा चेहरा एडिट करून लावलाय. त्यामध्ये डेव्हिड वॉर्नर कुस्तीपटूंची धुलाई करताना दिसतोय. अनेकांनी त्याचा हा व्हिडिओ लाईक केला आहे.  डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो. खासकरून त्याला भारतीय सिनेमांचं आकर्षण आहे.

पाहा Video -

IND vs AUS मालिकेतून बाहेर 

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या मालिकेतून डेव्हिड वॉर्नर बाहेर झालाय. दुखापतीमुळे त्याला आगामी सामन्यात खेळता येणार नाही. मोहम्मद सिराजच्या बाऊंसरचा मारा सहन करताना त्याला ही दुखापत झाली. त्यानंतर तो दिल्लीच्या रस्त्यावर फिरताना दिसला होता. तर ताजमहालला देखील त्याने भेट दिली होती.

दुसरा सामना झाल्यावर पॅट कमिन्सनं ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो तिसऱ्या कसोटीत खेळणार नसल्याचे स्पष्ट झालंय. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर हा दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नसल्याचं समोर आलं आहे.