नवी दिल्ली : डेव्हिड वॉर्नरनं बॉल टेम्परिंग प्रकरणात अडकल्यानंतर सरतेशेवटी आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादची कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय केलाय.
न्यूज एजन्सी 'एएनआय'नं एका ट्विटमधून ही माहिती दिलीय. सनरायजर्स हैदराबादचे सीईओ के. षण्मुघम यांनीही टीमच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर ट्विट करून याबद्दल माहिती दिलीय. 'सध्याच्या घटनांना पाहता डेव्हिड वॉर्नरनं सनरायजर्स हैदराबादची कॅप्टन्सी सोडलीय. टीमच्या नव्या कॅप्टनची घोषणा लवकरच केली जाईल' असं ट्विट त्यांनी केलंय.
नुकत्याच झालेल्या बॉल टेम्परिंग वादात कॅमरन बॅनक्रॉफ्टसोबत कॅप्टन स्टिव स्मिथनं कर्णधारपद आणि उपकर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. या वादानंतर स्मिथ आणि वॉर्नर दोघांनाही आयपीएलच्या कॅप्टन्सीतून हटवण्याचा दबाव वाढतोय.
In light of recent events, David Warner has stepped down as captain of SunRisers Hyderabad. The new captain of the team will be announced shortly: SunRisers Hyderabad. (file pic) pic.twitter.com/vHbVK3DUB8
— ANI (@ANI) March 28, 2018
स्मिथनं लवकरच राजस्थान रॉयल्समधून राजीनामा दिला परंतु, वॉर्नरनं मात्र कोणताही निर्णय घेतला नव्हता. वॉर्नरही पार्टी करण्यासाठी आणि सहखेळाडूंसोबत झालेल्या वादानंतर चर्चेत आला होता.
आता हैदराबाद टीमच्या कॅप्टनपदी शिखर धवन, ऋद्धिमान साहा, मनीष पांडे, केन विल्यमन्सपैंकी कोण आरुढ होणार, हे लवकरच समोर येईल. जर शिखर धवन किंवा साहाला कॅप्टन्सी सोपवली गेली तर आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सगळे कॅप्टन भारतीय असतील.