नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रिझर्व्ह नेचरचा आहे. तो आपल्या खाजगी जीवनाबद्दल फारसं काही बोलत नाही. धोनीला संपूर्ण क्रिकेट जगतात एक चांगला कर्णधार आणि विकेटकीपर मानले जाते. भारताचा तो एकमेव कर्णधार आहे ज्याने आयसीसी वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी-२०चा खिताब जिंकलाय. जगातील कोणत्याच फलंदाजाला हे जमले नाही ते धोनीने करुन दाखवले. २०१६मध्ये एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या नावाने त्याचा सिनेमा आला होता. या सिनेमातून धोनीच्या आयुष्यातील अनेक गुपिते समोर आली.
आपल्या पर्सनल लाईफपासून फॅन्सना दूर ठेवणाऱ्या धोनीच्या रोमँटिक लाईफबाबत या सिनेमातूनच अनेकांना समजले. साक्षीआधी धोनी दुसऱ्या मुलीवर प्रेम करत होता हेही या सिनेमातूनच समजले. मात्र आता धोनीच्या लव्ह लाईफबाबत आणखी एक नवा खुलासा झालाय. धोनी १२वीत असताना पहिल्यांदा प्रेमात पडला होता. ते त्याचे पहिले क्रश होते.
'एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' च्या सिनेमाच्या स्टोरीनुसार टीम इंडियामध्ये जेव्हा धोनीची एंट्री झाली होती तेव्हा त्याचे अफेयर प्रियंका झा नावाच्या मुलीशी सुरु होते. धोनीची प्रियंकाशी भेट विमानात झाली होती. त्यानंतर त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. धोनी आणि प्रियंका यांच्यात प्रेम वाढत गेले. दोघं लग्नही करणार होते. एकीकडे धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीला बहार येत होती. मात्र याच दरम्यान एका रस्ते अपघातात प्रियंकाचा मृत्यू होतो. प्रियंकाच्या मृत्यूनंतर धोनीवर संकटच कोसळते. प्रियंकाच्या आठवणीतून बाहेर येण्यासाठी तो क्रिकेटमध्ये स्वत:ला व्यस्त ठेवतो. त्यानंतर साक्षी त्याच्या जीवनात आली. धोनीने ४ जुलै २०१०मध्ये साक्षी रावतशी लग्न केले. दोघांना एक मुलगीही आहे.
नुकताच धोनीने त्याच्या पहिल्या क्रशबाबत खुलासा केलाय. एका कार्यक्रमादरम्यान त्याने हा खुलासा केला. यावेळी धोनीला त्याच्या पहिल्या क्रशबाबत विचारण्यात आले. यावेळी धोनी थोडा संकोचला मात्र त्यानंतर त्याने खुलेपणाने यावर उत्तर दिले. १२वीत शिकत असताना स्वाती नावाच्या मुलीवर त्याचा पहिला क्रश होता. ही १९९९मधील गोष्ट असल्याचे धोनीने सांगितले.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.