अबब... धोनीच्या फार्म हाऊसवर आणखी एका महागड्या घोड्याची एन्ट्री, Video व्हायरल

महेंद्रसिंह धोनीने स्कॉटलँडवरुन एक महागडा घोडा मागवला आहे.

Updated: Jun 12, 2021, 09:39 PM IST
अबब... धोनीच्या फार्म हाऊसवर आणखी एका महागड्या घोड्याची एन्ट्री, Video व्हायरल title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) माजी कर्णधार सध्या रांची इथल्या आपल्या फार्महाऊसवर कुटुंबियांसमवेत निवांत वेळ घालवतोय. आपले छंदही पूर्ण करतोय. धोनीला क्रिकेटबरोबरच कार आणि महागड्या बाईक्स चालवण्याचा छंद आहे. इतकंच नाही त्याला अश्व पालनाचीही आवड आहे. नुकतंच त्याचा फार्म हाऊसवर चेतकनंतर आणखी एका महागड्या घोड्याची एन्ट्री झाली आहे. 

स्कॉटलँडवरुन मागवला महागडा घोडा

महेंद्रसिंह धोनीने स्कॉटलँडवरुन एक महागडा घोडा मागवला आहे. शेटलँड पोनी जातीचा हा सफेद रंगाचा घोडा स्कॉटलँडहून रांचीत आला आहे. धोणीची पत्नी साक्षी हिने या घोड्याबरोबर खेळतानाचा धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. साक्षीने (Sakshi Dhoni) आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ टाकला असून या व्हिडिओत धोनी आपल्या नव्या घोड्याबरोबर शर्यत लावताना दिसतोय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r)

घोड्याची किंमत ऐकून डोळे होतील पांढरे

स्कॉटलँडहून आयात झालेल्या या घोड्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपयांच्या घरात आहे. या घोड्याचं वय दोन वर्ष असून वैशिष्ट्य म्हणजे या घोड्याची उंची केवळ 3 फुटापर्यंतच वाढू शकते. हा घोडा वेगासाठी नाही तर त्याच्या सुंदरतेसाठी ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी धोनीची मुलगी जीवा हिचा या घोड्याबरोबरचा फोटो शेअर करण्यात आला होता. या फोटोलाही चाहत्यांची पसंती मिळाली होती.