IPL 2020 : दिनेश कार्तिकने सोडलं केकेआरचं कर्णधारपद

'या' क्रिकेटपटूच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी

Updated: Oct 16, 2020, 09:24 PM IST
IPL 2020 : दिनेश कार्तिकने सोडलं केकेआरचं कर्णधारपद title=

दुबई : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना रंगला आहे. मात्र सामन्यापूर्वी केकेआर संघात मोठे बदल करण्यात आले. कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार दिनेश  कार्तीक कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कार्तिकने हा मोठा निर्णय घेतल्यानंतर कर्णधार पदाची जबाबदारी इऑन मॉर्गनकडे सोपवण्यात आली आहे. मला फलंदाजीवर आपले लक्ष केंद्रित करायचे असल्याचे कारण पुढे करत कार्तिकने कर्णधार पदावरून काढता पाय घेतला आहे. 

शिवाय मला संघासाठी अधिक योगदान द्यायचे आहे. या निर्णयामुळे त्याचं फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल असे कार्तिकने म्हटले आहे. २०१८ मध्ये कर्णधार म्हणून नियुक्त झालेल्या 35 वर्षीय खेळाडूने 37 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे.

मात्र आता मॉर्गन मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स दुसऱ्यांदा आमने-सामने आले आहे.  तेव्हा मुंबईने ४९ धावांनी विजय मिळवला होता. २३ सप्टेंबरला या दोघांमध्ये पहिला सामना रंगला होता.