अबुधाबी : कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स म्हणाला की, त्यांचा संघ आतापर्यंत आपला 'पूर्ण खेळ' दाखविण्यात अपयशी ठरला आहे, परंतु आयपीएल 2020 च्या आतापर्यंत केलेल्या कामगिरीचं त्यांना समाधान आहे. त्याची टीम पहिल्या 4 मध्ये आहे. 2 वेळा चॅम्पियन केकेआरने आतापर्यंत 4 सामने जिंकले आहेत. पण दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात संघ वर्चस्व मिळविण्यात अपयशी ठरला आहे.
मुंबई इंडियन्स (एमआय) विरुद्धच्या सामन्याच्या आदल्या दिवशी कमिन्स म्हणाला की, 'माझ्या मते 4 विजय, 3 पराभव, हा एक चांगला निकाल आहे. पॉईंट टेबलमध्ये आम्ही चौथ्या क्रमांकावर आहोत आणि आतापर्यंत आम्ही आमचा सर्वोत्कृष्ट खेळ देखील दाखवलेला नाही.'
नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यांत 4 पैकी 2 विजय मिळवले आहेत. पंजाब संघाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सुनील नरेन आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी चांगली कामगिरी केली. ज्यामुळे त्यांचा 2 धावांनी विजय झाला.
कमिन्स म्हणाला की, 'ते 2 सामने जिंकण्याचा आमचा हक्क नव्हता. परंतु आम्ही जिंकलो. ही खूप चांगल्या संघाची चिन्हे आहेत. आम्ही असे मानतो की आपण कोणत्याही स्टेजवरुन विजय मिळवू शकतो. आम्ही आशा करतो की आम्ही काही विभागांमध्ये काम करू, लवकरच आपला सर्वौत्तम खेळ दाखवू. अंतिम सामन्यापर्यंत आम्ही पूर्णपणे तयार आहोत.'