दीपा कर्माकरला आर्टीस्टिक विश्वचषकात कांस्य पदक

जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकारनं आर्टीस्टिक विश्वचषक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केलीय.

Updated: Nov 25, 2018, 11:07 PM IST
दीपा कर्माकरला आर्टीस्टिक विश्वचषकात कांस्य पदक title=

मुंबई : जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकारनं आर्टीस्टिक विश्वचषक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केलीय. वॉल्ट प्रकारात २५ वर्षीय दीपानं १४.३१६ गुणांची करत पदकाला गवसणी घातलीय. जगभरातील सर्वोत्तम खेळाडूंना टक्कर देत हे कांस्य पदक पटकावलं असल्यानं जणूकाही सुवर्णपदक पटकावलाय असा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया पदक पटकावल्यानंतर दीपानं व्यक्त केली. या विजयामुळे टोकयो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याच्या दीपाच्या आशा कायम राहिल्या आहेत. दीपाच्या गुडघ्यावर काही महिनांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर दीपानं ही नेत्रदीपक कामगिरी केलीय. ब्राझीलच्या रेबेका एंड्रेडनं सुवर्णपदक तर अमेरिकेच्या जेड कारेनं रौप्यपदक पटकावलं.