मुंबई : संपूर्ण जगाचं लक्ष आयपीएलचा अंतिम सामना कोण जिंकणार यावर आहे. त्यामुळे सगळ्यांचा नजरा तिकडे आहेत. यंदाच्या हंगामात गुजरात आणि लखनऊ टीम उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. आयपीएलमध्ये खेळाडूंवर पैसे लावून क्रिकेटप्रेमींना लॉटरी लागत आहे.
एका गरजू क्रिकेटप्रेमीचं नशीब एका रात्रीत फळफळलं आहे. जम्मूच्या तरुणासोबत एक असाच प्रकार घडला. अनंतनाग जिल्ह्यातील एका युवकाने ड्रीम 11 मध्ये 2 कोटी रुपये जिंकले. एका रात्रीमध्ये करोडपती बनला. अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात हा व्यक्ती राहात असल्याची माहिती मिळाली आहे.
कोट्यवधी रुपये जिंकल्यानंतर तो पहिल्यांदा आईवर उपचार करणार आहे. ड्रीम 11मध्ये त्याने खेळडूंवर पैसे लावले आणि त्याबदल्यात त्याला 2 कोटी रुपयांची लॉटरीच लागली.
''शनिवारी रात्री उशिरा मी गाढ झोपेत होतो, तेव्हा काही मित्रांनी मला फोन करून सांगितले की ड्रीम 11 मध्ये माझा पहिला नंबर आला.' गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलमध्ये फॅन्टसी टीम तयार करून नशीब आजमावत असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, 'रातोरात करोडपती होणे हे स्वप्नासारखे आहे.
हे मला गरिबी दूर करण्यास मदत करेल कारण आम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील आहोत. माझी आई आजारी आहे आणि आता मी तिच्यावर उपचार करू शकेन असं वसीम याने सांगितलं आहे.'' लॉटरी लागलेल्या वसीन राजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बातमीनं गावात आनंदाचं वातावरण आहे.