CSK vs KKR : विकेट घेताच ब्रावोचा 'नंबर 1' डान्स, काय आहे या स्टेपमागचं रहस्य

विकेट घेतल्याचं सेलिब्रशन तर आहेच पण ब्रावोच्या डान्समागे खास कारण आहे ते तुम्हाला माहितय का?

Updated: Mar 27, 2022, 12:31 PM IST
CSK vs KKR : विकेट घेताच ब्रावोचा 'नंबर 1' डान्स, काय आहे या स्टेपमागचं रहस्य title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची सुरुवात तर दणदणीत झाली. कोलकाता संघाने चेन्नईवर विजय मिळवला आहे. चेन्नईला 6 विकेट्सने धूळ चारत कोलकाता संघाने विजय मिळवला. मॅच दरम्यान सगळीकडे चर्चा होती ती ब्रावोच्या डान्स स्टेपची होत आहे.

विकेट घेतल्यानंतर ब्रावोने नंबर वन स्टेप केली. त्याच्या डान्सची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे. 10 व्या ओव्हर दरम्यान ब्रावोने विकेट काढली. त्याचा आनंद सेलिब्रेट करत त्याने मैदानात डान्सची स्टेप केली. ही स्टेप सध्या तुफान चर्चेत आहे. 

ब्रावोचं नंबर एक हे गाणं नुकतंच युट्यूबवर आलं आहे. या गाण्याची स्टेप त्याने मैदानात केली आहे. त्याचं हे हटके सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. 

ब्रावोने लसिथ मलिंगाच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. ब्रावोचं हे मैदानातलं सेलिब्रेशन चाहत्यांचं लक्ष वेधून घेणारं होतं. त्याचं नंबर वन हे गाणं युट्यूबला आलं आहे. त्याचं प्रमोशन करण्यासाठी ही स्टेप ब्रावोने केली असावी अशीही सोशल मीडियावर चर्चा आहे. 

चेन्नई सुपर किंग्सने कोलकाताला नाईट रायडर्सला विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिलं होतं. कोलकाताने 6 विकेट्स राखून हे आव्हान पूर्ण केलं. कोलकाता संघ पहिला सामना जिंकला आहे. सुरुवात चांगली झालीय ही अशीच घोडदौड कायम स्वरुपी ठेवली तर कोलकाता ट्रॉफीपर्यंत पोहोचू शकते.