मुंबई : आयपीएलचा 11 व्या सीजनमध्ये राजस्थान, बंगळुरु आणि चेन्नई या संघाना मोठा धक्का बसला आहे. कारण या संघांमधून इंग्लंडचे सर्व खेळाडू मायदेशी परतणार आहेत. २४ मे पासून इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात २ टेस्ट सामने होणार आहेत. यामुळे इंग्लंड 4 खेळाडू आयपीएलमध्येच सोडून इंग्लंडला रवाना होणार आहेत. ख्रिस वोक्स, मोईन अली (बंगळुरु), मार्क वुड (चेन्नई), बेन स्टोक्स (राजस्थान) हे खेळाडू मायदेशी परतणार आहे.
यंदाच्या आयपीएल लिलावात राजस्थानने बेन स्टोक्सवर १२.५० कोटी रुपयांची बोली लावली होती. बेन स्टोक्स अकराव्या सीजनमधला सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मात्र आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये स्टोक्स काही खास कामगिरी करता आलेली नाही. मार्क वुड आणि ख्रिस वोक्स हे देखील आयपीएलमध्ये काही खास कामगिरी करु शकलेले नाहीत.
चेन्नई मार्क वुडची अनुपस्थिती फारशी जाणवणार नाही. बंगळुरु स्पर्धेतून बाहेर झाली आहे. पण राजस्थानला बेन स्टोक्सची अनुपस्थिती जाणवू शकते. कारण राजस्थानला आयपीएलमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत राहण्यासाठी चांगल्या खेळाडूंची गरज आहे.