Hockey World Cup 2023 Team England: पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2023 स्पर्धा हळूहळू रंगतदार वळणावर येत आहे. साखळी फेरीतील सामने सुरु असून काही इंग्लंडनं पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. इंग्लंड संघांची आक्रमक खेळी पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पहिल्याच सामन्यात इंग्लंडनं वेल्सचा 5-0 ने पराभव केला. त्यानंतर 'बॅझबॉल' या रणनिती जोरदार चर्चा रंगली आहे. सध्या इंग्लंड क्रिकेट संघ बझबॉल रणनिती अवलंबून प्रतिस्पर्धी संघांना पराभवाचं पाणी पाजत आहे. इंग्लंड संघाची प्रशिक्षकपदाची जबाबदारी न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलमकडे सोपवल्यानंतर हा बदल दिसून आला आहे. त्यांच्या रणनितीला बॅझबॉल असं बोललं जातं. आता हीच रणनिती इंग्लंड संघ हॉकीमध्ये अवलंबत आहे.
इंग्लंड हॉकी संघातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या सॅम वार्डने सांगितले की, क्रिकेट संघाकडून आम्ही धडा घेत स्पर्धेत आक्रमक हॉकी खेळण्याचा विचार केला आहे. आम्ही 'बॅझबॉल' मानसिकतेने मैदानात खेळणार आहोत. आमचे प्रशिक्षक खरोखरच प्रोत्साहन देत आहेत हे खूप छान आहे. अपयशाची भीती काढून टाकणे, जसे बेन आणि ब्रँडनने केले आहे. तीच रणनिती आम्ही हॉकी टर्फवर अवलंबत आहोत. आम्हाला लोकांना दाखवून द्यायचं की आम्ही जबरदस्त खेळतो. त्यांनी आमचा सामना पाहण्यासाठी यावं."
Huge win to start the #HWC2023 for England pic.twitter.com/85rOvTcjp5
— England Hockey (@EnglandHockey) January 13, 2023
बातमी वाचा- Hockey WC 2023: "मला वाईट वाटते की, भारतात...", बेल्जियमच्या खेळाडूंचा गंभीर आरोप
इंग्लंडचा क्रिकेट प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम 'बॅझ' या टोपणनावाने ओळखला जातो. इंग्लंड संघासाठी त्याने आखलेली रणनिती पाहता या स्ट्रॅटर्जीला बॅझबॉल असं नाव पडलं. त्याच्या रणनितीने इंग्लंडचं क्रिकेट खेळण्याची स्टाईलच बदलून गेली. ब्रँडन मॅक्युलम आणि बेन स्टोक्स यांनी मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार म्हणून कसोटी संघाची धुरा सांभाळल्यापासून फलंदाज आणि गोलंदाज निर्भय आणि आक्रमक क्रिकेट खेळत आहे. ओडिशामध्ये सुरू असलेल्या हॉकी विश्वचषक 2023 मध्ये हीच शैली आता हॉकी टर्फवर पाहायला मिळत आहे.