Fifa World Cup : 3500 कोटींचं बक्षीस देणारं फिफा, इतके पैसे आणत कुठून? IPL याबाबतीत फिफाच्या आसपासही नाही

उपविजेत्या टीमसाठी $30 million म्हणजेच 247 कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र तुमच्या मनात कधी प्रश्न आलाय का? की फिफा इतका पैसा आणते कुठून...

Updated: Dec 16, 2022, 11:10 PM IST
Fifa World Cup : 3500 कोटींचं बक्षीस देणारं फिफा, इतके पैसे आणत कुठून? IPL याबाबतीत फिफाच्या आसपासही नाही title=

Fifa World Cup business model : स्पर्धा कोणतीही असो विजेता एकच असतो आणि त्याचा घसघशीत बक्षीस मिळतं हा अलिखित नियम. फुटबॉलमधील सर्वात मोठा उत्सव फिफाही त्याला अपवाद नाही. यंदाच्या वर्षी फिफा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला तब्बल $42 million म्हणजेच 347 कोटी रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. याशिवाय उपविजेत्या टीमसाठी $30 million म्हणजेच 247 कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र तुमच्या मनात कधी प्रश्न आलाय का? की फिफा इतका पैसा आणते कुठून...

फिफामध्ये ज्या पद्धतीने टीमना प्राईज मनीचं वितरण केलं जातं, त्यानुसार संस्थेकडे इतका पैसा येतो कुठून? फिफा एक नॉन-प्रॉफिट आर्गेनाईजेशन, त्यामुळे काय आहे याचं बिझनेस मॉडल, ते कसे पैसा कमवतात, जाणून घेऊया.

काय आहे फिफाचं बिझनेस मॉडेल?

फिफा ज्यावेळी वर्ल्डकपचं आयोजन करत तेव्हा त्यामध्ये भाग घेणाऱ्या सर्व टीम्सना काहीना काही तरी प्राईज मनी दिला जातो. यासाठी फिफा चहूबाजूंनी पैसा उभारतो. यामध्ये पहिल्या नंबर आहे, टेलिव्हिजन, दुसऱ्यावर टेलिविजन राईट्स आणि तिसरा लाइसेंसिंग राइट्स आणि चौथं म्हणजे तिकीटांची विक्री.

टेलीविजन राइट्स

फीफाच्या कमाईच्या सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे टेलिव्हिजन राईट्स. मोठ्या टेलिव्हिजन कंपन्या वर्ल्डकपसारख्या स्पर्धा आयोजित करण्याच्या हक्कांबाबत बोली लावतात. सर्वाधिक बोली लावणाऱ्याला जास्त प्रसारण मिळतं. शिवाय टेलिव्हिजननंतर आता फिफाने डिजिटल राइट्समधूनही कमाई सुरू केलीये.

मार्केटिंग राइट्स

मार्केटिंग राइट्स हे फिफाच्या कमाईचा आणखी एक स्त्रोत आहे. यामध्ये फिफाला स्पॉन्सर, रिजनल सपोर्ट्स आणि नॅशनल सपोटर्सकडून पैसा मिळतो. वर्ल्डकपसारख्या टूर्नामेंटमध्ये फिफा या चार पद्धतीने राईट्स विकून पैसे गोळा करतं.

लायसेंसिंग राइट्स

याशिवाय फिफाला रॉयल्टी तसंच ब्रँड लायसेंसिंग राइट्समधूनही पैसे मिळतात. फिफाच्या कमाईचा हा सर्वात मोठा स्त्रोत मानला जातो.

तिकीटांची विक्री

त्याचप्रमाणे फिफाचा वर्ल्डकप आयोजित केलेल्या देशांमध्ये होणाऱ्या मॅचच्या तिकिटांच्या विक्रीतूनही संस्थेला कोट्यवधींची कमाई मिळते. कतार फिफा वर्लडकपच्या बाद फेरीतील तिकिटाची किंमत 15 लाखांपेक्षा अधिक ठेवण्यात आलीये.