रोनाल्डोने खरेदी केली जगातील सर्वात महागडी कार; किंमत ऐकून थक्क व्हाल

रोनाल्डोने आपल्या कारच्या कलेक्शनमध्ये आणखी एका जबरदस्त कारचा समावेश केला आहे. 

Updated: Aug 4, 2020, 09:12 PM IST
रोनाल्डोने खरेदी केली जगातील सर्वात महागडी कार; किंमत ऐकून थक्क व्हाल
फोटो सौजन्य : Instagram

तुरिन : फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या कारच्या कलेक्शनमध्ये आणखी एका जबरदस्त कारचा समावेश केला आहे. रोनाल्डोने बुगाती सेंटोडिएसी (Bugatti Centodieci) ही नवी कार खरेदी केली आहे. रोनाल्डोने स्वत: याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. इटालियन क्लब जुवेंतसचा (Italian club juventus) स्टार स्ट्रायकर रोनाल्डोने इन्स्टाग्रामवर आपल्या नव्या कारसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोनाल्डोने घेतलेली नवी कार जगातील सर्वात महागडी कार आहे. याची किंमत जवळपास 75 कोटी रुपये इतकी आहे. ही कार अतिशय मर्यादित संख्येत उपलब्ध आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

You choose the view 

A post shared by Cristiano Ronaldo (@cristiano) on

दरम्यान, रोनाल्डोच्या क्लब जुवेंतसने नुकताच आपला नववा सेरी-ए-लीग Serie A किताब जिंकला आहे. ब्राझीलचा फुटबॉलपटू पेले याने सलग नवव्या वेळी सेरी-ए-लीग किताब जिंकल्यानंतर इटालियन क्लब जुवेंतसने त्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना पेले याने जुवेंतसचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला 'आधुनिक एथलिट' असं म्हटलं आहे. 35 वर्षीय रोनाल्डो या सीजनमध्ये 32 सामन्यांमध्ये 31 गोल्ससह जुवेंतसचा टॉप स्कोरर ठरला आहे.