Viral Video : तुम्ही सोशल मीडियावर आज कोणता व्हिडीओ पाहिला? जेवणाचा? खेळाचा की एखाद्या इन्फ्लूएन्सरचा? सध्या एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून एकतर तुम्ही पोट धरून हसाल किंवा मग, 'अरेच्चा! पकडा त्याला... ' असंच म्हणाल. कारण, या व्हिडीओमध्ये भर कार्यक्रमात एक खेळाडू धाडकन खड्ड्यात पडताना दिसत आहे.
किंग्स लीग अमेरिका या कार्यक्रमासाठी गेरार्ड पिकनं हजेरी लावली होती. त्याचवेळी एक असा प्रसंग घडला ज्यामुळं कार्यक्रमाला आलेल्या अनेकांना हसू आलं, तर काहींच्या चेहऱ्यावरील हावभाव क्षणात बदलले.
गेरार्ड पिक माईकवर बोलत स्टेजच्या काठापाशी चालत आला. तिथं एक फुटबॉलप्रेमी त्याची जर्सी घेऊनच उभा होता. प्रेक्षकांमध्ये असणाऱ्या त्या चाहत्याच्या दिशेनं गेरार्ड आला आणि त्याचा स्टेज तिथं संपला याची जाणीवच झाली नाही. गेरार्डनं एक पाऊल टाकलं आणि तो धाडकन तिथं असणाऱ्या एका खड्डावजा जागेत पडला. बस्स, मग काय? तिथं एकच पळापळ झाली.
Gerard Pique fell down a hole by the stage at the launch of his Kings League Americas competition. pic.twitter.com/v87cLvEaWi
— Pop Crave (@PopCrave) October 25, 2023
एका क्षणात गेरार्डचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्याची ही कृती पाहून तिथं असणाऱ्या काही प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. तर, काही चाहत्यांनी थेट गेरार्डच्या खासगी आयुष्यावरच टीका केली. जगप्रसिद्ध गायिका शकिरा आणि गेरार्ड कधीकाळी एकमेकांच्या प्रेमात होते. पण, या नात्यात गेरार्डनं तिची फसवणूक केली. बस्स, याचाच उल्लेख करत हा त्याच्या कर्माचीच फळं भोगतोय असं म्हणत नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. गेरार्ड पडला खरा, पण त्याच्या या पडण्यामुळं त्याचं खासगी आयुष्य पुन्हा प्रकाशझोतात आलं आणि एका क्षणात पुन्हा शकिराला फसवणंच तुला महागात पडलं, असंही अनेकजण म्हणू लागले. तुम्ही यापैकी कोणत्या गटात?
सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.