India vs England Test Series 2021 आधी वाईट बातमी, दिग्गज गोलंदाजाचं निधन

त्यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.  

Updated: Jul 27, 2021, 09:10 PM IST
 India vs England Test Series 2021 आधी वाईट बातमी, दिग्गज गोलंदाजाचं निधन

लंडन :  टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका (India vs England Test Series 2021) खेळवण्यात येणार आहे. या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी यजमान इंग्लंडसाठी वाईट बातमी आली आहे. इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज माईक हँडीक  (Mike Hendrick) यांच आज (27 जुलै) निधन झालंय.  वयाच्या 72 व्या  वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  ते कॅन्सरशी झुंज देत होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. (former england faster bowler Mike Hendrick passed away of age 72)

हँड्रीक यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1948 ला इंग्लंडच्या डर्बीशरमध्ये झाला.  त्यांनी 1969 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला सुरुवात केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर त्यांना इंग्लंडच्या  कसोटी आणि वनडे टीममध्ये स्थान मिळवलं. 

टीम इंडिया विरुद्ध दमदार कामगिरी

हँड्रीक यांनी इंग्लंडकडून 52 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी नेहमीच भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यांनी 30 कसोटींमध्ये 25.8 च्या सरासरीने 87 विकेट्स घेतल्या. तर 22 वनडेत  19 च्या एव्हरेजने 35 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.  हँड्रीक यांनी टीम इंडिया विरुद्ध चमकदार कामगिरी केली होती. त्यांनी भारताविरुद्धच 1974 मध्ये कसोटी पदार्पण केलं. टीम इंडिया विरुद्ध खेळलेल्या 7 कसोटींमध्ये त्यांनी 16 च्या सरासरीने 26 विकेट्स पटकावल्या होत्या.