हो मी 'Gay 'आहे, 'या' क्रिकेटरचा धक्कादायक खुलासा

खरंच 'हा' स्टार क्रिकेटर Gay आहे का? काय म्हणालाय खेळाडू वाचा

Updated: Aug 2, 2022, 04:20 PM IST
 हो मी 'Gay 'आहे, 'या' क्रिकेटरचा धक्कादायक खुलासा title=

मुंबई : क्रिकेट विश्वातील अनेक महिला खेळाडू आहेत ज्यांनी समलिंगी असल्याचा खुलासा केला होता. ही गोष्ट त्यांनी जाहीरपणे मान्य केली होती. मात्र पुरुष खेळाडूंबाबत अशा क्वचितच घटना घडल्या आहेत. पुरुष खेळाडूंमध्ये असे दोनचं खेळाडू आहेत, ज्याने ते समलिंगी असल्याचा खुलासा केला आहे. हा खेळाडू कोण आहे व त्याने याबाबत कधी खुलासा केला आहे, हे जाणून घेऊयात. 

'हा' पहिला खेळाडू 
इंग्लंडचा माजी यष्टिरक्षक स्टीव्हन डेव्हिस याने तो समलिंगी असल्याचा खुलासा केला होता. 2011 च्या सुरुवातीला त्याने 'गे' असल्याचे उघड केले होते. अशा प्रकारे तो समलिंगी असल्याचे जाहीरपणे मान्य करणारा पहिला पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला होता.

दुसरा खेळाडू
स्टीव्हन नंतर आता आणखीण एका खेळाडूने तो समलिंगी असल्याचे मान्य केले होते. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू हीथ डेव्हिसने सुद्धा तो समलिंगी असल्याचा खुलासा केला होता. अशाप्रकारे तो आता पुरुषांमधील दुसरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनला ज्याने गे असल्याचे जाहीरपणे कबूल केले आहे. तसेच तो न्यूझीलंडचा पहिला गे क्रिकेटर आहे.

कारकिर्द
हीथ डेव्हिसचे वेगवान गोलंदाज होता. त्याने न्यूझीलंडसाठी 5 कसोटी आणि 11 एकदिवसीय सामने खेळले आहेत. हीथ डेव्हिसने हा सामना 1994 ते 1997 दरम्यान खेळला होता. त्याचे देशांतर्गत क्रिकेट उत्कृष्ट होते.

मुलाखतीत काय म्हणाला?
हीथने द स्पिनऑफ या ऑनलाइन मासिकेशी बोलताना सांगितले की, 'मला वाटले की हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे आणि मी ते लपवत होतो. त्यात बरंच काही होतं जे मला आयुष्यात बाजूला ठेवायचं होतं. मी एकटा होतो. मी ते दाबत होतो. मी समलिंगी जीवन जगत नव्हतो, असे त्यांनी म्हटले.

तो पुढे म्हणतो,'मला वाटले की माझ्या आयुष्याचा एक भाग सांगण्याची गरज आहे. मी ते लपवत होतो. ऑकलंडमधील प्रत्येकाला माहित होते की मी समलिंगी आहे, अगदी संघातही. पण ते फार मोठे वाटले नाही. मला मोकळे वाटायचे. 

डेव्हिसने सांगितले की जेव्हा तो 1997 मध्ये त्याच्या मूळ शहर वेलिंग्टनमधून ऑकलंडला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक सुधारणा झाल्याचे सांगतो.