मुंबई : पाकिस्तानच्या लाहोरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटरला बकरी ईद आधी मोठा धक्का बसलाय. कारण बकरी ईद आधी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची बकरी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडलीय. त्यामुळे बकरी ईद आधी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूवर मोठ संकट ओढवलंय.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमलची बकरी चोरीला गेल्याची घटना घडलीय. चोरीला गेलेला बोकड खरेदी करून बकरीदला कुर्बानीसाठी घरी आणण्यात आला होता. मात्र बकरीदपूर्वीच चोरट्यांनी कामरान अकमलची बकरी चोरून नेली. कामरान अकमलच्या घरी यावर्षी बकरीदला 6 बकऱ्यांचा बळी दिला जाणार होता, मात्र त्यापैकी एक चोरीला गेला आहे. सोशल मीडियावर ही बातमी पसरल्यानंतर नागरीक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
जिओ न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कामरान अकमलच्या वडिलांनी बकरीदला कुर्बानी देण्यासाठी एक दिवस आधी बाजारातून 6 बकरे खरेदी केले होते. या बकऱ्या त्यांनी घराबाहेर बांधल्या होत्या. पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी कामरान अकमल यांची बकरी चोरून नेली. शेळी पाळण्यासाठी ठेवलेली व्यक्ती झोपली आणि चोरट्यांनी बकरी चोरून नेल्याची घटना घडली.
माजी पाकिस्तानी क्रिकेटर कामरान अकमलच्या वडिलांनी सांगितले की, बकरी ईदला कुर्बानीसाठी बाजारातून 6 बकरे खरेदी करण्यात आले होते. त्यातील एक बकरी चोरट्यांनी चोरून नेली. त्या बोकडाची किंमत ९० हजार रुपये होती.
कामरान अकमलची शेळी चोरीला गेल्याची माहिती गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. चोरांना लवकरात लवकर पकडले जाईल आणि त्यांची चोरी झालेली बकरी परत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी कामरान अकमलच्या कुटुंबीयांना दिले आहे.