IND vs ENG 1st T20: इंग्लंडच्या कर्णधाराकडून टीम इंडियाच्या बॉलर्सचं कौतुक,म्हणाला...

हार्दिक पंड्याने 4 विकेट्स घेतल्या तरीही निव्वळ 1 विकेट घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारच का होतंय इतकं कौतुक? 

Updated: Jul 8, 2022, 02:07 PM IST
IND vs ENG 1st T20: इंग्लंडच्या कर्णधाराकडून टीम इंडियाच्या बॉलर्सचं कौतुक,म्हणाला...  title=

मुंबई : पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा संपुर्ण संघ तंबून धाडत 50 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाच्या बॉलर्सनी चांगली कामगिरी केली. याच बॉलर्सची प्रशंसा आता इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने केले. तर ज्या बॉलरने त्याला गोल्डन डकचं शिकार केलं त्या भूवनेश्वरचे तर त्याने गोडवेचं गायले.    

टीम इंडियाच्या बॉलर्सनी पहिल्या टी20 सामन्यात चांगली गोलंदाजी केली. हार्दीक पंड्याने अर्धशतकी खेळी करत 4 विकेट्सही काढल्या. तसेच अर्शदिपने पदार्पणात 2 विकेटस आणि चहलने तितकेच विकटेस काढले. तर भुवनेश्वरने 1 विकेट काढली. 

टीम इंडियाचे सर्वंच बॉलर्सने जास्त विकेट घेतल्या असल्या तरी भूवनेश्वरचे सर्वाधिक कौतुक होतेय. कारण भूवनेश्वरने तीन ओव्हर्स टाकत निव्वळ 10 रन्स दिल्या आहेत. या तीन ओव्हरमध्ये त्याने कर्णधार जोस बटलरला गोल्डन डकचा शिकार बनवलं. ही सर्वांधिक महत्वाची विकेट होती.  

बटलर काय म्हणाला?

"भारतीय गोलंदाजांनी नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी केली आणि आमच्यावर दबाव आणला. सुरुवातीच्या फटक्यातून आम्ही सावरू शकलो नाही असे जोस बटलर म्हणाला. तो पुढे म्हणतो,  तो (भुवनेश्वर) सतत आणि बराच वेळ स्विंग करत राहिला. माझ्या मते टी-20 सामन्यांमध्ये प्रथमच वेळ, चेंडू इतका वेळ स्विंग होत राहिला असल्याचे बटलर म्हणाला. 

तसेच भुवनेश्वर कुमारमध्ये कोणत्याही परिस्थितीत चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे. बटलर हसला आणि म्हणाला की कदाचित आम्ही एकच चेंडू थेट स्टँडमध्ये आणून स्विंग थांबवू शकलो असे तो म्हणाला.