मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल कुंबळेनं कॅप्टन विराट कोहलीवर थेट आरोप केले आहेत. मी पुन्हा प्रशिक्षक व्हावं म्हणून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि लक्ष्मण यांच्या समितीनं मला सांगितलं. पण कॅप्टनला माझ्या कार्यपद्धतीबद्दल आणि प्रशिक्षक म्हणून कायम राहण्याबद्दल आक्षेप आहेत, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं, म्हणून मी राजीनामा दिला आहे, असं प्रसिद्धी पत्रक कुंबळेनं ट्विटरवर शेअर केलं आहे.
कॅप्टननं घेतलेल्या या भूमिकेमुळे मला आश्चर्य वाटलं कारण कॅप्टन आणि प्रशिक्षकाच्या भूमिकेतल्या मर्यादेचा मी नेहमीच आदर केला आहे. बीसीसीआयकडून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तरीही मी राजीनामा घेतल्याचा निर्णय घेतल्याचं कुंबळे म्हणाला आहे.
Thank you! pic.twitter.com/eF5qVzdBRj
— Anil Kumble (@anilkumble1074) June 20, 2017