रॉकेट थ्रोवर फसला हार्दिक पांड्या, पार्टनरवर संतापला आणि पुढे जे घडलं ते.... पाहा व्हिडीओ

पार्टनरवर संतापला हार्दिक पांड्या, मॅचमध्ये नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ  

Updated: Apr 9, 2022, 09:10 AM IST
रॉकेट थ्रोवर फसला हार्दिक पांड्या, पार्टनरवर संतापला आणि पुढे जे घडलं ते.... पाहा व्हिडीओ title=

मुंबई: राहुल तेवतियाने पंजाबच्या हातातोंडाशी असलेला विजयाचा घास शेवटच्या 2 बॉलवर षटकार ठोकून हिरावून घेतला. राहुल तेवतियाचं खूप कौतुक होत आहे. गुजरात टीमला पंजाबवर 6 विकेट्सने विजय मिळवण्यात यश आलं. हा हार्दिक पांड्याचा तिसरा विजय आहे. तर पंजाबचा दुसरा पराभव आहे. 

पंजाब विरुद्ध सामन्यात हार्दिक पांड्या संतापल्याचं पाहायला मिळालं. ओडियन स्मित बॉलिंग करत होता. यावेळी डेव्हिड मिलर स्ट्राइकवर होता. हार्दिक पांड्या आणि मिलर रन काढण्यासाठी पुढे आले. त्याच वेळी बेयरस्टोने बॉल थ्रो करत हार्दिक पांड्याला रन आऊट केलं. त्याच्या रॉकेट थ्रोवर पांड्या रन आऊट झाला. 

हार्दिक पंड्या रन आऊट झाल्याने मैदानात संतापला होता. डेव्हिड मिलरवर तो नाराज असल्याचंही पाहायला मिळालं. सोशल मीडियावर हार्दिकच्या रनआऊटचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

गुजरातकडून शुभमन गिलने 96 धावांची खेळी केली. 4 धावांनी त्याचं शतक हुकलं. तर राहुल तेवतियाने 2 षटकार ठोकून विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने 18 बॉलमध्ये 27 धावा केल्या.