हार्दीक पांड्या पुन्हा ट्विटर झाला ट्रोल !

भारताचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दीक पांड्याची बॅट सध्या मैदानावर तुफान कामगिरी करत नसली तरीही सोशल मीडीयावर मात्र त्याची छाप कायम आहे. 

Updated: Feb 22, 2018, 05:45 PM IST
हार्दीक पांड्या पुन्हा ट्विटर झाला ट्रोल !  title=

मुंबई : भारताचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दीक पांड्याची बॅट सध्या मैदानावर तुफान कामगिरी करत नसली तरीही सोशल मीडीयावर मात्र त्याची छाप कायम आहे. 

हार्दीक पांड्याचा नवा लूक 

हार्दीकने नुकताच एक नवा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याच्या फॅन्सनी या लूकचं कौतुक केलं असलं तरीही काहींनी मात्र त्याला खेळावर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

 

भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर 

सध्या भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर हार्दीक पांड्याची फलंदाजी आणि गोलंदाजीही फारशी कमाल करू शकलेली नाही. 

नेटकर्‍यांची टीका 

सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर हार्दीक पांड्यावर नेटकर्‍यांनी टीका केली आहे. 'एकतर मॉडेलिंग कर नाहीतर खेळाकडे लक्ष दे दोन्ही गोष्टीत पडू नकोस' अशा शब्दांत काहींनी हार्दीकला सल्ला दिला आहे.