हा खेळाडू भारतीय संघासाठी बजावणार महत्त्वाची भूमिका, 'मॅन ऑफ द टूर्नामेंट'चा प्रबळ दावेदार

टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. भारतीय संघ हा वर्ल्डकप (T20 world cup) जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे

Updated: Oct 19, 2021, 04:05 PM IST
हा खेळाडू भारतीय संघासाठी बजावणार महत्त्वाची भूमिका,  'मॅन ऑफ द टूर्नामेंट'चा प्रबळ दावेदार title=

नवी दिल्ली : टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. भारतीय संघ हा वर्ल्डकप (T20 world cup) जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. टीममध्ये एक असा खेळाडू आहे जो एकटा टीम इंडियाला टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकवून देऊ शकतो. हा खेळाडू 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' (Man of tha tournament) होण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. हार्दिक पांड्या (Hardik pandya) टी-20 विश्वचषकात भारताचा सर्वात मोठा क्रिकेटर ठरू शकतो. हार्दिक पंड्या 2021 च्या टी-20 विश्वचषकात मोठी भूमिका बजावू शकतो. जेव्हाही तुम्हाला एखादी मोठी स्पर्धा जिंकायची असते, तेव्हा तुम्हाला नेहमी अशा खेळाडूंची गरज असते जे शेवटपर्यंत संघासोबत राहतात आणि तो म्हणजे हार्दिक पांड्या.

हार्दिक पांड्या त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये सर्वोत्तम आहे. हार्दिक त्याच्या फलंदाजीने अधिक भूमिका बजावतो, कारण जेव्हा जेव्हा भारताला वेगवान धावांची गरज असते, तेव्हा हार्दिक ती कामगरी करत असतो. त्याच्याकडे गोलंदाजांविरुद्ध मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात धावा काढण्याची क्षमता आहे.

टी 20 विश्वचषक 2021 भारतात होणार होता, परंतु कोरोना विषाणूमुळे ते यूएईमध्ये हलवण्यात आला. यावर्षी टी -20 विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला प्रबळ दावेदार मानले जाते, पण एक संघ आहे जो टीम इंडियाचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंग करू शकतो. टी -20 विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न भंग करू शकणारा संघ म्हणजे वेस्ट इंडीज, टी-20 फॉरमॅटमधील सर्वात धोकादायक संघ. 2016 मध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजने उपांत्य फेरीत भारताला पराभूत करून बाहेर केले. 2016 च्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपदही वेस्ट इंडिजने जिंकले होते, जो यावेळी गतविजेता देखील आहे.

भारत आणि पाकिस्तान 24 ऑक्टोबर रोजी टी 20 विश्वचषक 2021 मध्ये आमनेसामने येतील. टी 20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. टी -20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारताचा विजयी विक्रम 5-0 आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असल्याने पुन्हा एकदा दोन्ही देशांदरम्यान एक रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. 2016 च्या विश्वचषकात शेवटच्या वेळी टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 5 गडी बाद 118 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 4 विकेट गमावून लक्ष्य मिळवले होते.

स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी संघांना दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांना गट 1 मध्ये स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर गट 2 मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. याशिवाय दोन्ही गटात प्रत्येकी दोन संघ पात्रता फेरीतून येतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी -20 मध्ये एकूण 8 सामने झाले आहेत ( IND VS PAK), त्यापैकी टीम इंडियाने 7 जिंकले आहेत तर पाकिस्तानने फक्त एक सामना जिंकला आहे. पाकिस्तानने भारतावर शेवटचा विजय 2012 मध्ये मिळवला होता. अशा स्थितीत पाकिस्तानचा संघ 9 वर्षांपासून भारतावर विजय मिळवण्याची तळमळ बाळगून आहे.

टी -20 विश्वचषकासाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (कीपर), इशान किशन (कीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.