PAK vs NED : पहिल्याचा डोळा फोडला तर दुसऱ्याशी पंगा! बाबर आझमसमोर Haris Rauf चा उथळ कारभार; पाहा Video

ICC ODI Cricket World Cup : पाकिस्तान आणि नेदरलँड (PAK vs NED) यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानला गोलंदाज हॅरिस रौफने (Haris Rauf) घातक गोलंदाजी करत नेदरलँडला गुडघ्यावर टेकवलं. या सामन्यात हॅरिस रौफचा उथळ कारभार देखील समोर आलाय.

Updated: Oct 6, 2023, 11:15 PM IST
PAK vs NED : पहिल्याचा डोळा फोडला तर दुसऱ्याशी पंगा! बाबर आझमसमोर Haris Rauf चा उथळ कारभार; पाहा Video title=
Haris Rauf fight PAK vs NED Cricket World Cup 2023

Haris Rauf fight with Paul van Meekeren : वर्ल्ड कपच्या (ICC ODI Cricket World Cup) दुसऱ्या सामन्यात (PAK vs NED) पाकिस्तानने नेदरलँडचा पराभव केला. मात्र, नेदरलँडने पाकिस्तानच्या नाकात दम केला होता. पाकिस्तानने 49 षटकात 10 गडी गमवून 286 धावा केल्या आणि विजयासाठी 287 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, नेदरलँडने चांगली सुरूवात केल्यानंतर पाकिस्तानच्या मनात धास्ती भरली होती. त्यावेळी बाबर आझमने (Babar Azam) स्टार बॉलर हॅरिस रौफ (Haris Rauf) याच्या हातात बॉल सोपवला अन् त्यानंतर हॅरिसने मैदानात थेट नेदरलँडच्या खेळाडूंशी पंगा घेतल्याचं दिसून आलं. सामन्यात नेमकं काय झालं? पाहुया...

पाकिस्तानने दिलेल्या 287 धावांचं आव्हान पार करताना नेदरलँडची सुरूवात चांगली झाली. मॅक्स ओडॉड लवकर बाद झाल्यानंतर विक्रमजीत सिंग आणि बास डी लीडे (Bas de Leede) यांनी पाकिस्तान नाकात दम केला. त्याचवेळी हॅरिस रौफने रडीचा डाव खेळला. एका घातक बॉलवर रौफने  बास डी लीडे याचा डोळा फोडला. त्यानंतर देखील त्याचा बॉऊंसर चालूच होते. सामन्याच्या अखेरीस देखील रौफने बाऊंसरचा मारा केला. त्यावेळी त्याने पॉल व्हॅन मीकरेन याच्याशी पंगा घेतला. पॉल व्हॅन मीकरेन याने देखील बाबरला रोखठोक उत्तर दिलं. 

सामन्याच्या 39 व्या ओव्हरला बाबर गोलंदाजीसाठी आता. तेव्हा पाकिस्तानला विजयासाठी फक्त एका विकेटची गरज होती. मात्र, पॉल व्हॅन मीकरेन (Paul van Meekeren) याने विकेट पडू दिली नाही. पॉल व्हॅन मीकरेनची झुंज पाहून हॅरिसचा पारा चढला. त्यावेळी त्याने मीकरेनला डिवचण्याचा प्रयत्न केला. मीकरेन अन् हॅरिस रौफ यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर पुढच्याच बॉलला पॉल व्हॅन मीकरेन याने बाबरला कवर ड्राईव्ह मारत मारला अन् चार धावा खात्यात जोडल्या. त्यानंतर रौफला पारा आणखीच चढला अन् अखेर रौफने पॉल व्हॅन मीकरेनच्या दांड्या गुल केल्या. त्याने हॅरिसने रागात पॉल व्हॅन मीकरेनला खुन्नस दिली. 

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by CricTracker (@crictracker)

नेदरलँडचा संघ: स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कॅप्टन), इमाम उल हक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.