Congress Candidate Anirudh Chaudhary: देशभरात हळू हळू सगळीकडेच विधानसभेच्या निवडणुका सुरु झाल्या आहेत. हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यभरात जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान हरियाणाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत आता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागही रिंगणात उतरल्याने हे अधिकच रंजक झाले आहे.
हरियाणातील तोशाममधून निवडणूक लढवणारे काँग्रेस उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांच्या समर्थनार्थ वीरेंद्र सेहवाग रिंगणात उतरला. काँग्रेसचे बटण दाबून अनिरुद्ध चौधरींना विजयी करण्याचे आवाहन त्याने तोषमच्या जनतेला केले.
वीरेंद्र सेहवागने अनिरुद्ध चौधरी यांच्यासाठी मतं मागितल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्याबद्दल त्यांनी वीरेंद्र सेहवागचे आभारही मानले. वीरेंद्र सेहवाग आणि अनिरुद्ध चौधरी यांची मैत्री जुनी आहे. असे सांगितले जाते की जेव्हा ते दोघेही भेटतात तेव्हा ते क्रिकेटबद्दल कमी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त बोलतात.
ELECTION BREAKING
Former Cricketer Virender Sehwag bats for Congress: 'press Congress button on 5th October'.
CONGRESS pic.twitter.com/h3AcVoCi49
— Saibpal Pandit (@PanditSaibpal) October 2, 2024
उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अनिरुद्ध चौधरी यांना तोषमची जनता स्वीकारेल का? किंवा वीरेंद्र सेहवागला स्पोर्टसाठी मैदानात उतरवणे कितपत फायदेशीर ठरेल हे ५ ऑक्टोबरलाच कळेल.
वीरेंद्र सेहवागच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने भारतासाठी 374 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यात 38 शतकांसह 17 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये सेहवागची भूमिका ही ओपनरची होती.
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.